सध्या माध्यमांमध्ये कलाविश्वातील एक प्रकरण चांगलंचय गाजतंय. ते प्रकरण दुसरं तिसरं कोणतं नसून भाजप नेत्या, टिकटॉक स्टार आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट हिच्या हत्येचं आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे केले जात आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, पण अशातच एक हैराण करणारा दावा करण्यात आला आहे. सोनालीच्या जवळचा व्यक्ती असलेला रिषभ बेनीवाल याने माध्यमांना खळबळजनक माहिती दिली आहे. याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रिषभ बेनीवाल (Rishabh Beniwal) याने दावा केला आहे की, आरोपी सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) सोनाली फोगाट (Sonali Phogat) हिच्यावर ताबा मिळवण्यासाठी तांत्रिकाचा (Tantrik) वापर करत होता. त्यासाठी त्याने अनेकदा त्याच्या फार्म हाऊसवर तांत्रिकाला बोलावले होते.
या प्रकरणात पोलिसांनी सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवान याच्यासह इतर चार व्यक्तींनाही अटक केली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींमध्ये सुधीर सांगवानव्यतिरिक्त सुखविंदर सिंग, कथित अं’मली पदार्थ विक्रेता आणि गोव्यातील कर्लिज रेस्टॉरंटचा मालक यांचा समावेश आहे.
View this post on Instagram
रिषभ बेनीवालचे सुधीर सांगवानवर आरोप
रिषभ बेनीवाल याने सुधीर सांगवान याच्यावर आणखी आरोपही लावले. तो म्हणाला की, “सोनालीची मुलगी यशोधर हिच्या जीवालाही सुधीरकडून धोका आहे. माझ्या उपस्थितीत त्याने सोनालीशी गैरव्यवहार केला होता. त्याच्याकडे काहीतरी होते, ज्यामुळे सोनाली त्याचे सर्व ऐकायची. मी सोनालीला त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डबद्दल सांगितले होते. शेतकऱ्यांशी फसवणुकीची चर्चा.” त्याने पुढे सांगितले की, रोहतक येथे सुधीरच्या गुन्हेगारी रेकॉर्डची फाईल आहे. तो म्हणाला, “अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली.”
सुधीर सांगवान याच्या कथित फसवणुकीचा शिकार झालेला शेतकरी अमित दांगी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सुधीर सांगवान सोनाली फोगाट हिच्यासोबत शेतकऱ्यांकडे यायचा, त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप आहे. ज्या शेतकऱ्यांसोबत फसवणूक झाली आहे, त्यांच्यासोबत सोनाली फोगाटचा व्हिडिओही आहे.”
अमित दांगी यांनी पुढे सांगितले की, सोनाली फोगाटला तिच्या फार्म हाऊसवर शेतकऱ्यांची आयुर्वेदिक उत्पादने उगवायची होती. हे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.
सोनाली फोगाट हिने छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त असलेल्या ‘बिग बॉस’ या शोच्या १४व्या पर्वात सहभाग घेतला होता. तिला तिच्या टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरील व्हिडिओंमुळे चांगलीच प्रसिद्ध झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल १२०० कोटींच्या ‘केजीएफ २’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला झालाय कँसर, सूज लपवण्यासाठी वाढवली दाढी
मिनाक्षी राठोडने घातलं लेकीचं बारसं, खास स्टाईलमध्ये सांगितले मुलीचे नाव
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास, फोटो व्हायरल