शाहरुख खानची (Shahrukh Khan) सुहाना खान (Suhana Khan), श्रीदेवींची (Sridevi) मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. लोकप्रिय कॉमिक मालिकेवर आधारित असलेल्या झोया अख्तरच्या (Zoiea Akhtar) दिग्दर्शनातील आगामी ‘द आर्चीज’ या चित्रपटातून हे तिघे पदार्पण करणार आहेत. सुहाना, खुशी आणि अगस्त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘द आर्चीज’च्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. निर्मात्या रीमा कागतीने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रीमा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘द आर्चीज’च्या पहिल्या शॉटची माहिती दिली आहे. हा चित्रपट रीमा आणि झोया एकत्रितपणे तयार करणार आहेत. फरहान अख्तरने (Farhan Akhtar) त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ही पोस्ट पुन्हा शेअर केली आणि टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, चित्रपटात अगस्त्य आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे, तर खुशी आणि सुहाना बेट्टी आणि वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (suhana khan khushi kapoor agatsya nandas film the archies begins shooting)
झोयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच या प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, या चित्रपटातील कलाकारांबाबत तिने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंग उटी आणि त्याच्या जवळच्या हिल स्टेशन्समध्ये केले जाईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा