Saturday, June 29, 2024

सुहाना खानकडून आई गौरीला वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा! वडील शाहरुखसोबतचा थ्रोबॅक फोटो केला शेअर

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि डिझायनर गौरी खानने शुक्रवारी (८ ऑक्टोबर) तिचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. आज भलेही तिच्यासाठी हा आनंदाचा दिवस असेल. परंतु ही वेळ त्यांच्या आयुष्यात संकटांनी भरलेली आहे. क्रूझ शिपमध्ये अं’मली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपाखाली त्यांचा मुलगा आर्यन खानला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्याचा जामीनही फेटाळला आहे.

अशातच शाहरुख आणि गौरीची मुलगी सुहाना खानने आईच्या वाढदिवशी सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शाहरुख आणि गौरीचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थ डे आई.” या पोस्टवर अनन्या पांडे, महीप कपूर यांसारख्या कलाकारांनी कमेंट करून गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहाना आता परदेशात तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. (Suhana khan share a throwback picture of shahrukh khan and gauri khan, for birthday wish to mother)

गौरी खानचा जन्म ८ ऑक्टोबर, १९७० साली झाला होता. ती चित्रपट निर्माती असल्यासोबतच एक डिझायनर देखील आहे. तिने अनेक मोठमोठे लोकं तसेच बॉलिवूड कलाकारांसाठी डिझाईन केले आहे. शाहरुख आणि गौरीची पहिली भेट १९८४ साली दिल्लीमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाची नावे आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान ही आहेत. आता आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्याचे संपूर्ण खान कुटुंब खूप चर्चेत आले आहे.

सुहाना खान ही सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रिय असते. सुरुवातीला तिचे सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट होते, परंतु काही दिवसांपूर्वी तिने तिचे अकाऊंट सार्वजनिक केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यावर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता सोशल मीडियावर तिचे दोन मिलियनपेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…

हे देखील वाचा