बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची किती चलती आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्यात जर बॉलिवूडच्या बादशहाचे मुलं असतील तर काही विचारायलाच नको. कलाकरांना जेवढे लाईमलाइट मिळते तेवढेच किंबहुना त्याहून जास्त मीडिया फुटेज या स्टार किड्सला मिळते. स्टार किड्स प्रकाशझोतात येण्याचे मुख्य कारण म्हणजे सोशल मीडिया. सध्या इंडस्ट्रीमध्ये असलेले सर्वच तर किड्स सोशल मीडियावर सक्रिय आहे. अशीच एक प्रचंड लोकप्रिय स्टार कीड म्हणजे, सुहाना खान. शाहरुख खानची लेक असलेली सुहाना सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय आहे. तिला लोकहो यूजर्स फॉलो करतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सुहानाने नुकताच तिचा एक बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
सुहानाने इंस्टाग्राम अकाउंटवर जो फोटो पोस्ट केला आहे, त्यात तिने लाल रंगाचा डीप बॅक असलेला स्लिव्हलेस बॉडीकॉन ड्रेस घातला असून, तिचा हा पाठमोरा फोटो सध्या चांगलाच गाजत आहे. या ड्रेसवर तिने केस बांधलेले असून, गोल्डन हूप इयररिंग्स घातलेले दिसत आहे. घराच्या बाल्कनीमध्ये उभी राहून तिने पोज दिली आहे. या फोटोमध्ये सुहाना छान आणि आकर्षक दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सने भरभरून कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. (suhana khans bold look in red dress)
या कमेंट्स करणाऱ्यांमध्ये शनाया कपूर, महीप कपूर, भावना पांडे यासोबतच अनेक बॉलिवूडमधील नामचीन लोकांचा देखील समावेश आहे. सुहानाची गिनती टॉपच्या स्टार्स किड्समध्ये होते. अजून सुहानाने चित्रपटांमध्ये एन्ट्री केली नसूनही तिची लोकप्रियता मोठ्या अभिनेत्री एवढीच आहे.
सध्या सुहाना टिस्क स्कूल ऑफ़ आर्ट्स, न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये चित्रपटांचा अभ्यास करत आहे. सुहानाला चित्रपटांमध्ये करियर करायचे आहे, मात्र शाहरुख खानने आधी तिला तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. मागच्याचवर्षी ती एका शॉर्ट फिल्ममधे दिसली होती. सुहानाच्या पदार्पणावरून आजपर्यंत अनेक बातम्या किंबहुना अफवा उडवल्या गेल्या. मात्र ती चित्रपटांमध्ये कधी येणार हे अजून काहीच नक्की नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’
-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात










