Wednesday, June 26, 2024

करोडोंच्या फसवणुकीचा आरोप असलेल्या सुकेशवर बनणार बॉलिवूड चित्रपट, जॅकलिन साकारणार मुख्य भूमिका?

कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर चित्रपट बनणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध निर्मात आनंद कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी आनंद कुमार मंडोली कारागृहात पोहोचले आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडून त्याची संपूर्ण कहाणी जाणून घेतली.

सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrashekhar) 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्याच्यावर अनेक आरोप आहेत. अशा परिस्थितीत आता त्याच्यावर चित्रपट बनवल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माते आनंद कुमार यांनी या चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी तुरुंग प्रशासनाशी संपर्क साधला आणि सुकेशची संपूर्ण कथा जाणून घेतली आहे. या चित्रपटात सुकेशच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आणि फसवणुक संबंधित संपूर्ण कथा सांगितली जाणार आहे, ज्यामध्ये त्याचे कोणत्या अभिनेत्रींसोबत संबंध आहेत, याचाही समावेश केला जाऊ शकतो.

200 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुकेश तुरुंगात आहे, तर दुसरीकडे या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याही नावाचा समावेश आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या दाेन्ही अभिनेत्री सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये हाेत्या आणि त्यांनी सुकेशवर झालेल्या आरोपांमध्येही हातभार लावला असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत जॅकलीन आणि नोरा फतेही यांची भूमिकाही चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सुकेश चंद्रशेखर हा 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सुकेशवर राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींकडून पैसे उकळल्याचा आराेप आहे. यासाेबतच फार्मा कंपनी रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी अदिती सिंग यांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

याशिवाय सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला महागड्या भेटवस्तू पाठवल्याचा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, त्याने जामिनाच्या कालावधीत मुंबई ते चेन्नईसाठी चार्टर्ड फ्लाइटही बुक केली होती. अशात या सर्व आरोपाखाली सुकेश तुरुंगात आहे.( sukesh case a bollywood film will be made on sukesh chandrashekhar accused of cheating 200 crores)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेड कार्पेटवर दीपिकाच्या ‘या’ लूक्सने निर्माण केली दशहत, सादर करणार ऑस्कर अवाॅर्ड

हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिता दिसली एक्स बाॅयफ्रेंडसाेबत, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा