Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड सुकेश चंद्रशेखरला बनवायचे होते नोरा फतेहीला आपली गर्लफ्रेंड, बदल्यात दिली होती ही ऑफर…

सुकेश चंद्रशेखरला बनवायचे होते नोरा फतेहीला आपली गर्लफ्रेंड, बदल्यात दिली होती ही ऑफर…

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे सतत चर्चेत असतात. अलीकडेच दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान दोघांनीही आपले जबाब नोंदवले होते. या दोघांनी कोर्टात दिलेली स्टेटमेंट आता समोर आले आहे. या वक्तव्यांवरून आता सुकेश अभिनेत्रींना आमिष दाखवून कसे फसवायचे हे समोर आले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, नोराने तिच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे की, ‘सुकेश त्याची पार्टनर पिंकी मार्फत खोट्या गोष्टी घडवून आणायचा.’ नोराच्या म्हणण्यानुसार, ‘सुकेशने तिला आपली मैत्रीण होण्यास सांगितले होते. त्या बदल्यात त्याने अभिनेत्रीला आलिशान घर आणि महागड्या जीवनशैलीचे आमिष दाखवले होते.’ नोराने आपल्या वक्तव्यात म्हंटले आहे की, ‘तो पिंकी इराणीच्या माध्यमातूनच आपला मॅसेज देत असे.’ सुकेशला ती कधीच भेटली नव्हती आणि त्याच्या फसवणुकीची तिला कल्पनाही नव्हती, असेही या अभिनेत्रीने न्यायालयात सांगितले आहे. ईडी कार्यालयातच तिने सुकेशला पहिल्यांदा पाहिल्याचा दावा नोराने निवेदनात केला आहे.

सुकेशनेही तिला महागड्या जीवनशैलीचे आमिष दाखविल्याचे जॅकलीनने तिच्या निवेदनात म्हटले आहे. अभिनेत्रीने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पिंकी तिच्या मेकअप आर्टिस्टच्या संपर्कात आली आणि तिला विश्वासात घेतले.’ जॅकलिनच्या म्हणण्यानुसार, ‘पिंकी इराणीने सुकेशला सन टिव्हीचे मालक असल्याचे सांगितले.’ जॅकलिनच्या म्हणण्यानुसार, ‘पिंकीने तिला सांगितले होते की, सुकेशचे अनेक प्रोजेक्ट आहेत ज्यात त्याला तिला बघायचे आहे.’

अभिनेत्रीने असेही सांगितले आहे की, ‘सुकेश तिच्याशी कॉल आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधायचा. त्याने एकदाही आपण ठग असल्याचा आभास हाेऊ दिला नाही.’ केरळला गेल्यावर ती आपल्या खासगी जेटमध्ये गेली हाेती, असे जॅकलीनने आपल्या निवेदनात सांगितेल. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती त्याला फक्त दोनदा भेटली होती.

जॅकलिन फर्नांडिस हिच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘मर्डर’, ‘रेस 3’, ‘किक’, ‘सर्कस’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (sukesh chandrasekhar case actress nora fatehi actress jacquline fernandez statement on conman)

हे देखील वाचा