Wednesday, June 26, 2024

सुकेश चंद्रशेखरने होळीच्या शुभेच्छा देताना चक्क जेलमधून लिहिले जॅकलिन फर्नांडिसला प्रेम पत्र, पत्राचा फोटो झाला व्हायरल

सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग केसमध्ये आल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस सतत मीडियामध्ये चर्चेत येत आहे. सुकेश आणि जॅकलिन हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील सांगितले जात आहे. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरवर फोर्टिसचे माजी प्रमोटर यांच्या पत्नीकडून २०० कोटी रुपये वसूलण्याचा आरोप आहे. याच आरोपांतर्गत तो सध्या जेलमध्ये असून, त्याने तिथून जॅकलिनला एक पत्र लिहिले आहे. या पात्राच्या माध्यमातून त्याने तिला आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

सुकेश चंद्रशेखरने ले पत्र जॅकलिनसोबतच संपूर्ण मीडियाला देखील लिहिले आहे, आणि त्याची बाजू मांडण्यासाठी सर्वांना धन्यवाद म्हटले आहे. यासोबतच त्याने त्याचे कुटुंब, मित्र, सार्थक आणि त्याचा तिरस्कार करणाऱ्यांना आणि त्याच्या कायदेशीर काम करणाऱ्या टीमला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात त्याने जॅकलिनसाठी काही खास देखील लिहिले आहे.

पत्रात सुकेशने लिहिले आहे की, “मी सर्वात शानदार, अद्भुत अशा माझ्या जॅकलिनला होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. रंगांचा सण असलेल्या होळीच्या दिवशी मी तुला वचन देतो की या वर्षी मी माझ्या स्टाइलमध्ये पूर्ण जोमाने आणि ब्राइटनेसह तुझ्या आयुष्यातून निघून गेलेले रंग १०० पट वाढवून परत घेऊन येईल. मी वचन देतोय आणि ही माझी जबाबदारीही आहे. तुला देखील माहीत आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतो. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू कायम हसत राहा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माय बेबी गर्ल, माय जॅकी”

तत्पूर्वी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या मनी लॉन्डरिंग केसच्या सुनावणी दरम्यान सुकेशने सांगितले होते की, जॅकलिन फर्नाडिस या घोटाळ्यात सामील नव्हती. तर जॅकलिनने म्हटले होते की, कॉनमॅनने तिचे आयुष्य नरकासारखे केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज पाकिस्तानी कलाकार कवी खान यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन

उफ्फ! रुबीना दिलैकचा ग्लॅमरस अंदाज, पाहणऱ्याचीही उडेल झाेप

हे देखील वाचा