Tuesday, July 9, 2024

मिनाक्षी राठोडने घातलं लेकीचं बारसं, खास स्टाईलमध्ये सांगितले मुलीचे नाव

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. मालिकेची रंजक कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. या मालिकेतील देवकीची भूमिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ही भूमिका अभिनेत्री मिनाक्षी राठोडने साकारली होती. मिनाक्षीने तिच्या प्रेग्नेंसीमुळे मालिकेतून  ब्रेक घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच तिने मुलीला जन्म दिला होता. आता तिने मुलीचे नावही जाहीर केले आहे. 

 

मिनाक्षी राठोडच्या मुलीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. ज्याचा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने बाळाचे नावही सांगितले आहे. या पोस्टमध्ये तिने मला यारा या नावाने हाक मारा असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनाही हे नाव आवडले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास, फोटो व्हायरल
प्रकाश राज यांच्या ट्विटवर भडकले नेटकरी; म्हणाले, ‘तू तर दुसरा स्वरा भास्कर’
अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवीन बिझनेस, नाव ठेवण्याची भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

हे देखील वाचा