Saturday, July 6, 2024

‘अखेर राहुलचा ‘हा’ प्रवास संपला’ म्हणत विकास पाटीलने म्हटले सुखं म्हणजे नक्की काय मालिकेला अलविदा

सध्या स्टार प्रवाहावरील अतिशय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असते’. मालिका सुरु होऊन अनेक महिने किंबहुना वर्ष झाले असले तरी मालिका अजूनही टॉपवर आहे. याचे कारण म्हणजे मालिकेत सतत येणारे उत्कंठावर्धक ट्विस्ट. यामुळे प्रेक्षक सतत मालिकेशी जोडला जात आहे. आता देखील ही मालिका अतिशय रंजक वळणावर आहे. मालिकेत खलनायिका साकारणाऱ्या शालिनीचा पर्दाफाश झाला असून, तिला जेल झाली आहे. यातच आता शालिनीचा भाऊ असलेल्या राहुलने मालिकेतून एक्सिट घेतली आहे. या मालिकेत ‘राहुल’ ही भूमिका अभिनेता विकास पाटील साकारत होता. त्याने आता मालिका सोडल्यानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

विकास पाटीलने या पोस्टमधून त्याचा अनुभव, मालिका टॉपला असण्यामागचे कारण आदी सर्वच गोष्टींबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. विकासने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या भूमिकेचा एक कोलाज करत व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, “अलविदा राहुल …

अखेर राहुलचा सुख म्हणजे काय असतं मधला प्रवास संपला …असं वाटतंय काल परवाच शूटिंग सुरु झालं होतं..जवळपास सात महिने ह्या मालिकेचा भाग होतो,पण हे सात महिने सात दिवसांसारखे वाटतायत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Patil (@vikaspatil.official)

प्रत्येक मालिकेचं युनिट हे एका कुटुंबासारखं असतं आणि हे कुटुंब फारच जिव्हाळ्याचं आणि लाडकं ठरलं ..ज्या प्रेमाने आणि आत्मीयतेने सगळ्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं ते लाजवाब होतं. हि मालिका पहिल्यापासून नंबर वन ला असण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तिथली पॉसिटीव्हिटी असं मला वाटतं जी फार कमी ठिकाणी जाणवते ..!

मला ह्या कुटंबाचा सदस्य करून घेतल्याबद्दल स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन यांचे मनापासून आभार. प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानायचे तर इथे थिसीस लिहावा लागेल पण प्रामुख्याने आमच्या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कानसे (सर आता फिल्म करूयात असं ज्यांना सतत म्हणायचो) पूर्ण डिरेकशन टीम खास करून शशी तुम्ही सगळे कमाल आहात !

महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, माधुरी देसाई आणि तिची संपूर्ण प्रोडक्शन टीम, आमच्या मालिकेचा लेखक आणि चांगला मित्र अभिजीत गुरु आणि त्याची टीम , आमचा क्रीटीव्ह हेड, संपूर्ण लाईट, आर्ट, कॉस्च्युम, मेकअप आणि स्पॉट दादांची टीम

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Patil (@vikaspatil.official)

आणि लास्ट बट नॉट लीस्ट आमच्या सुपरहिट मालिकेचे सुपरहिट कल्ला कार …
जुग जुग जियो ..और नाम रोशन करो.

आणि अर्थात सगळ्यात महत्वाचे आणि मानाचे तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्यांनी राहुलवर भरभरून प्रेम केलंत …त्याला आपलंस केलंत, असंच प्रेम मी केलेल्या प्रत्येक पात्रावर कराल हा विश्वास आहेच… मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन character सोबत लवकरच …. गणपती बाप्पा मोरया”.

विकासने त्याच्या या पोस्टमधून कलाकारांपासून, क्रू मेंबर, सेटवरील माणसं, प्रोडक्शन, डिरेक्शन आदी सर्वच लोकांचे आभार देखील मानले आहे. विकासने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, तो काही चित्रपटांमध्ये देखील झळकला आहे. याशिवाय बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये देखील तो शेवटच्या फेरीपर्यंत पोहचला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर

हे देखील वाचा