Friday, March 13, 2026
Home अन्य ही मैत्री की आणखी काही? बाळूमामा फेम सुमित पुसावलेचा ‘या’ अभिनेत्रीसोबत फोटो पाहून रंगली चर्चा

ही मैत्री की आणखी काही? बाळूमामा फेम सुमित पुसावलेचा ‘या’ अभिनेत्रीसोबत फोटो पाहून रंगली चर्चा

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. मालिका बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित आहे. मालिकेत बाळूमामा हे पात्र अभिनेता सुमित पुसावले निभावत आहे. आज तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे. त्याचे पात्र, भाषा प्रेक्षकांना खास भावत आहेत. मालिकेत सध्या त्याचे रूप जरा उतार वयातील दाखवले असले तरी देखील सुमित त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच हँडसम दिसतो. सोशल मीडियावर देखील तो मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याने त्याच्या एका मैत्रिणिसोबत सोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याच्यासोबत अभिनेत्री आणि मॉडेल दिशा परदेशी दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ते नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. फोटोमध्ये दोघांनीही काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ते एकेमेकांकडे बघत आहे. दोघेही खूप खुश दिसत आहेत. (sumit pusavel share photo with her friend disha pardeshi)

हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “माझी जवळची मैत्रीण जी नेहमीच माझ्यासोबत असते.” तसेच त्याने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याच्या या फोटोवरून आता अशी चर्चा रंगू लागली आहे की, दिशा नक्की सुमितची मैत्रीण आहे की खास मैत्रीण आहे? त्याचे अनेक चाहते त्याच्या या पोस्टवर कमेंट करून त्याला प्रश्न विचारत आहेत.

दिशा परदेसी ही मराठी मालिकांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे. ती साड्या आणि ज्वेलरी ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करते. तसंच ती एक फॅशन मॉडेल आहे. ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिशाने निहारिकाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

हेही वाचा :

‘…पण तू मला जिवंत केलंस’, म्हणत तेजस्विनी पंडित झाली सिंधुताई सपकाळ यांच्या प्रवासावर व्यक्त

लांबचा पल्ला पार करून चाहत्यांनी गाठले कार्तिक आर्यनचे घर, व्हिडिओ शेअर करत अभिनेता म्हणाला…

…म्हणून दीपिकाने केला तिच्या वाढदिवसाचा जंगी बेत रद्द, वाचून तुम्हीही म्हणाल, ‘अरे हे काय झालं’

 

हे देखील वाचा