Monday, February 24, 2025
Home मराठी ‘कब आयेगा मजा’ म्हणत सुमित राघवनने केले ‘आरे कारशेडवर’ विवादात्मक ट्विट

‘कब आयेगा मजा’ म्हणत सुमित राघवनने केले ‘आरे कारशेडवर’ विवादात्मक ट्विट

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत जे समाजातील विविध घटकांवर त्यांचे मत मांडत असतात. यातीलच एक अभिनेता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो तसेच घडणाऱ्या विविध गोष्टींवर तो त्याचे मत मांडत असतो. तू अभिनेता म्हणजे सुमित राघवन. (sumit raghavan) सामाजिक आणि राजकीय अशा अनेक मुद्द्यांवर तो त्याचे मत परखडपणे मांडत असतो. त्यामुळे अनेकदा चर्चेत असतो, तसेच अनेकवेळा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत.

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. त्यातीलच एक निर्णय म्हणजे आरेतील मेट्रो प्रकल्प. या प्रकल्पाला अनेकजण विरोध दर्शवत आहेत. आता अभिनेता सुमित राघवनने आरे मेट्रो प्रकल्पला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर निशाणा साधला आहे. याबाबत त्याचे एक ट्विट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पर्यावरण प्रेमींनी आरे मेट्रोला विरोध दर्शवला आहे. काही दिवसापूर्वी त्याचे “कारशेड वही बनेगा” हे ट्विट मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते.

सुमित राघवने अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू झाल्या म्हणून अभिनंदन करणारे ट्विट केले. संदर्भात लिहिताना सुमित ट्विट केलं आहे की, “कब आयेगा मजा मला नेहमी असं वाटायचं की हा प्रोजेक्ट पूर्ण होताना तुम्ही तिथे असायला हव्यात आणि तुम्ही तिथेच आहात.” त्यांनी केलेले हे ट्विट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने वायरल होत आहे.

अभिनेता सुमित राघवन हा मुंबईचा मूळचा आहे. तो एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. अनेक शो देखील तो होस्ट करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मल्लिका शेरावतने ‘मर्डर’ चित्रपटाची केली दीपिकाच्या ‘गेहराइया’शी तुलना; म्हणाली मी 15 वर्षांपूर्वी हेचं केलं होतं’

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला नीतू कपूर देत नाही सल्ला, स्वतः सांगितले कारण..

‘वाणीला ढाल बनवत रणबीर स्वत:ची करतोय सुटका, की दुसरं काही?’, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा प्रश्न

हे देखील वाचा