अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती टिव्ही इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर दिसत असते. ‘द कपिल शर्मा शो’ फेम सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. सुमोनाला प्रवास करायला खूप आवडते. ती बऱ्याचदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या प्रवासासंबंधित पोस्ट शेअर करत असते. नुकताच सुमोनाने अभिनेत्री उर्वशी ढोलकियासोबतचे स्विमिंग पूल मधील काही फोटो शेअर केले आहेत. त्या दोघींसोबत तरण राजाही आहे.
तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती स्विमींग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत असून, दुसऱ्या फोटोमध्ये तिने उर्वशीसोबतचा पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकाऱ्यानी भरपूर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “ब्युटीफुल लेडीज” त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले, “वाॅव ब्यूटीफुल”, “लव्ह यू ब्यूटीफुल डॉल” अशा स्वरूपाच्या भरपूर कमेंट्स तिच्या या पोस्टवर येत आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ तर खूपच प्रसिद्ध झाला या शोसोबतच यातील कलाकारही खूप लोकप्रिय झाले आहेत. सुमोना देखील याच शोने एक नवीन ओळख मिळवून दिली. तिने तिच्या मेहनतीच्या आणि कामगिरीच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकताच कपिल शर्मा शोचा नवीन सिझन सुरु झाला. या शोच्या नवीन प्रोमोमध्ये सुमोना दिसली नव्हती, त्यामुळे अनेकांना वाटले की, तिने हा शो सोडला. याबद्दल अर्चना पूरन सिंग यांनी एकदा सांगितले होते की, “सुमोना शोचा एक महत्वाचा भाग आहे. शोमध्ये तिच्या व्यक्तिरेखेत एक मोठा ट्विस्ट दिसणार आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की, सुमोना चक्रवर्ती या शोमध्ये नाही, तर लवकरच तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे. या शोच्या पर्वामध्ये सुमोना देखील दिसणार आहे, पण तिचा अवतार पूर्वीपेक्षा खूप वेगळा असेल.”
सुमोनाने गेल्या काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ती एंडोमेट्रिओसिस रोगाशी झुंज देत आहे. सुमोनाने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिले की,“ कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर याबद्दल कधी बोलली नाही. लॉकडाऊन माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण आहे.” तसेच तिने पुढे लिहिले की,“सर्व गोष्टी सांगणे माझ्यासाठी सोपे नव्हते, पण जर ही पोस्ट एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते किंवा एखाद्याला प्रेरणा देऊ शकते तर ते माझ्यासाठी पुरेसे असेल. प्रत्येकजण आपल्या जीवनात काही ना काही समस्यांशी लढत असतो. हे महत्वाचे आहे की प्रेम, सद्भावना आणि दयाळूपणापासून कोणीही दूर जाऊ नये.”
सुमोना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतली आहे. जेव्हा सुमोना ‘द कपिल शर्मा शो’च्या प्रोमोमध्ये दिसली नव्हती, तेव्हा अफवांचा बाजारच भरला होता. यावेळी सुमोना शोचा भाग होणार नसल्याचे सांगण्यात आले. पण सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या प्रोमोमध्ये समोना दिसली होती आणि ती पुन्हा शोमध्ये आल्याचे स्पष्ट झाले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट