Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन हैदराबाद बलात्कार प्रकरणावर बोलली सुमोना चक्रवर्ती; म्हणाली, ‘फोकस फोटोशूटवर नाही, तर…’

हैदराबाद बलात्कार प्रकरणावर बोलली सुमोना चक्रवर्ती; म्हणाली, ‘फोकस फोटोशूटवर नाही, तर…’

टेलिव्हिजन अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिने अलीकडेच अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट विरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाली होती, तीही एक महिला आहे आणि तिच्या भावना दुखावल्या नाहीत. आता शुक्रवारी तिने एक बातमी शेअर केली, की कशाप्रकारे १६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आमदाराच्या मुलाला जामीन मिळाला.

काय म्हणाली सुमोना?
ही बातमी शेअर करताना सुमोना म्हणाली की, “आता यामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत.” तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एका बातमीचा फोटो शेअर करत सुमोनाने लिहिले की, “आता यामुळे माझ्या भावना आणखी दुखावल्या आहेत. हे अपमानजनक आहे. फोकस फोटोशूटवर नसून एनजीओवर असावा. जामिनासाठी फक्त ५०००. हा अजामीनपात्र गुन्हा आहे.” (sumona chakravarti sentiments hurts in hyderabad rape case)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुमोनाने शेअर केलेल्या बातमीनुसार, २८ मे रोजी एका पबमधून १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर पाच किशोरांसह, सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा एका आमदाराचा मुलगा असून, त्याला बुधवारी राज्यात विरोध होत असतानाही जामीन मंजूर करण्यात आला.

दौऱ्यावरून परतली सुमोना
उल्लेखनीय आहे की, सुमोना चक्रवर्ती नुकतीच कपिल शर्मा शोच्या लाइव्ह टूरमधून संपूर्ण टीमसोबत परतली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ व्यतिरिक्त, ती बर्फी (2012), किक (2014) आणि फिर से… (2015) सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा