Wednesday, October 15, 2025
Home अन्य भारीच ना! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना चक्रवर्तीची एन्ट्री; प्रेक्षकांना लवकरच मिळणार मोठ्ठं ‘सरप्राईज’

भारीच ना! ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना चक्रवर्तीची एन्ट्री; प्रेक्षकांना लवकरच मिळणार मोठ्ठं ‘सरप्राईज’

अभिनेता कपिल शर्मा त्याच्या टीमसह पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. या शोबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ मधील पहिला पाहुणा अक्षय कुमार आहे. जो ‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये येणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, हा शो २३ ऑगस्टपासून प्रसारित केला जाऊ शकतो. त्याचबरोबर प्रेक्षकांना आणखी एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. खरं तर या शोमध्ये सुमोना चक्रवर्ती देखील पुनरागमन होणार आहे.

जेव्हा कपिल शर्माने त्याच्या टीमसोबत फोटो शेअर केले. तेव्हा सुमोना त्यात कुठेही दिसली नव्हती. तेव्हापासून असे तर्क लावले जात होते की, सुमोनाला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर या सर्व अफवांचा आता अंत झाला आहे. खरं तर अलीकडेच शोने ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’च्या टीमसोबत शूट पूर्ण केले आहे. यासोबतच तिने इंस्टाग्रामवर सेटवरील फोटो शेअर केले होते आणि चाहत्यांना सांगितले की, ती सुद्धा या शोचा एक भाग असणार आहे.

या शोच्या जज अर्चना पूरन सिंग देखील टीमसोबत शोमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यांनी सांगितले की, सुमोना ही बाकीच्या कलाकारांसोबत असणार आहे. पण तिच्या व्यक्तिरेखेमध्ये एक मोठा ट्विस्ट दडलेला आहे. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जर तुम्हाला असे वाटत असेल की सुमोना शोचा भाग नाही, तर तुम्हाला एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. सुमोना या शोचा एक भाग आहे. पण ती थोड्या वेगळ्या अवतारात असणार आहे.”

फेब्रुवारीमध्ये, द कपिल शर्मा शो ऑफ एअर गेला होता. याचे कारण सांगण्यात आले होते की, कपिलला त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा होता. त्यानंतर, कपिलने अलीकडेच टीमसोबत एक फोटो शेअर केला आणि माहिती दिली की, तो छोट्या पडद्यावर परतत आहे. तसेच सुदेश लहरी त्याच्या टीममध्ये सामील होत आहे.

 

इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना अजय देवगणने असेही लिहिले की, ‘कपिल शर्मा, तुझ्याबरोबर घालवलेले हे क्षण अद्भुत होते. मला नाही आठवत की मी याअगोदर कधी इतका हसलो असेल. तुमचे आणि तुमच्या साथीदारांचे खूप खूप अभिनंदन. नवीन सीझनमध्ये तुम्ही सर्व धमाल कराल.”

चंदन, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, भारती सोबत आता कपिलच्या टीममध्ये सुमोना देखील आहे. यावेळी कपिलची ऑनस्क्रीन पत्नी बनणारी सुमोना कोणत्या पात्रात दिसतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

-मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

हे देखील वाचा