Friday, July 5, 2024

नवा ट्विस्ट? लतिका म्हणतेय, ‘तुम्ही दोघांनी मिळून माझा जीव…’; तर अभिमन्यू अन् नंदिताने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली.’ या मालिकेने अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. ९ चा ठोका वाजला की, घराघरात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही एकच मालिका चालू असते. या मालिकेतील पात्र, त्यांचा संवाद, वेशभूषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना प्रामुख्याने पसंत‌ पडतात. त्यातील लतिका आणि तिच्या सासूचे पात्र तर सर्वांना खूप भावतं. तसेच बाकी अनेक पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेत सध्या एक ट्वीस्ट आले आहे. अभिमन्यूच्या मैत्रिणीची म्हणजेच अभिनेत्री आदिती द्रविड हिची एंट्री झाली आहे आणि ती लतिका आणि अभिमन्यू यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच लतिका, अभिमन्यू आणि नंदिता यांचा एक धमाल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अक्षया नाईकने म्हणजेच लतिकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आदिती, समीर आणि अक्षया दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समीर अक्षयाला पुढे ढकलतो आणि आदितीला जवळ घेतो. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘आप दोनोने मिल के’ हे गाणे लागले आहे. यावर अक्षया हावभाव करताना दिसत आहे. (Sundra manamadhe bharali fame Latika, abhimanyu and nandita’s funny video viral on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “सध्या लतिकाची परिस्थिती अशी आहे. तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तसेच अनेकजण हसण्याची ईमोजी पोस्ट करत आहे.

या मराठी मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहे. एक मुलगी जाड असल्याने तिच्या बापाला तिचे लग्न करण्यासाठी किती उंबरठे झिजवावे लागतात हे या मालिकेत दाखवले आहे. ३४ नकार आल्यानंतर मुलीचे लग्न ठरते, पण हुंडा या अनिष्ट प्रथेमुळे मुलीचे लग्न पुन्हा एकदा मोडते. त्यानंतर एका मुलाला लग्नाला उभे राहावे लागते. यानंतर भौतिक गोष्टी सोडून त्यांच्यातील प्रेम कहाणीला कशी सुरुवात होते हे या मालिकेत दाखवले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा