Monday, July 1, 2024

‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ होय. या मालिकेने अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. ९ चा ठोका वाजला की, घराघरात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही एकच मालिका चालू असते. या मालिकेतील पात्र, त्यांचा संवाद, वेशभूषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पसंत‌ पडतात. त्यातील लतिका आणि तिच्या सासूचे पात्र तर सर्वांना खूप भावते. तसेच बाकी अनेक पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडतात. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत. मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे लतिका आणि अभिमन्यू एकमेकांपासून लांब राहतात. तसेच आता लतिकाचे वडील तिला अभिमन्यूसोबत घटस्फोट घ्यायला सांगत आहेत. तसेच मालिकेत शर्यत सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील मालिका खूप उत्साहाने पाहत आहेत.

अशातच मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे अक्षया नाईक, समीर परांजपे आणि संदेश उपशम यांचे दोन फोटो समोर आले आहेत. अक्षयाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, अक्षया समीरच्या जवळ गेली आहे, तर संदेशने तिचा दुसरा हात पडकला आहे. (Sundra manamadhye bharali fame Akshya naik share a funny photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “कुछ कुछ होता है अभ्या तुम नही समजोगे.” ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला शनिवारी (१६ ऑक्टोबर) २३ वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने अक्षयाने ही पोस्ट केली आहे. या फोटोवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना त्यांचा हा फोटो खूप आवडला आहे. तसेच त्यांचे हावभाव देखील खूप आवडले आहेत.

या मराठी मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहे. एक मुलगी जाड असल्याने तिच्या बापाला तिचे लग्न करण्यासाठी किती उंबरठे झिजवावे लागतात, हे या मालिकेत दाखवले आहे. ३४ नकार आल्यानंतर मुलीचे लग्न ठरते, पण हुंडा या अनिष्ट प्रथेमुळे मुलीचे लग्न पुन्हा एकदा मोडते. त्यानंतर एका मुलाला लग्नाला उभे राहावे लागते. यानंतर भौतिक गोष्टी सोडून त्यांच्या प्रेम कहाणीला कशी सुरुवात होते हे या मालिकेत दाखवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची’, कुशल बद्रिकेच्या फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट ठरतेय लक्षवेधी

-‘टू क्युटीज इन वन फ्रेम’, झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील नेहा आणि परीचा मोहक फोटो व्हायरल

-‘अगर हम शायर होते तो…’ अनुजा साठेच्या ग्लॅमरस फोटोवरील चाहत्याची कमेंट ठरतीय लक्षवेधी

हे देखील वाचा