Friday, July 5, 2024

‘संदेसे आते है’ गाण्यावरील अफलातून परफॉर्मन्स पाहून सुपरस्टार सुनील शेट्टीही झाला भावुक; पृथ्वीराजला मारली मिठी

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ हा सध्या टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या शोपैकी एक आहे. यामध्ये रोज काहीतरी वेगळे पाहायला मिळते. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्स देखील अफलातून असतात. अशातच या आठवड्याच्या एपिसोडमध्ये शोच्या मंचावर बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी दिसणार आहे. त्यामुळे या स्पेशल एपिसोडमध्ये सुनील शेट्टीच्या गाण्यांवर स्पर्धक परफॉर्मन्स देणार आहेत. यावेळी एका गाण्यावरील परफॉर्मन्स पाहून सुनील शेट्टी खूप भावुक झाला आणि तो रडायला लागला. हे पाहून शो मधील शिल्पा शेट्टी आणि इतर लोक देखील भावुक झाले.

या एपिसोडच्या प्रोमोमध्ये सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी एकत्र येताना दिसत आहेत. ते त्यांच्या ‘धडकन’ या चित्रपटातील ‘तुम दिल की धडकन में रहते हो’ या गाण्यावर डान्स करताना दिसतात.

या शोमधील स्पर्धक पृथ्वीराज आणि शुभ्रोनिल यांनी त्याचा सुपरहिट चित्रपट ‘बॉर्डर’ मधील ‘संदेसे आते है’ या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. त्यांच्या या परफॉर्मन्स पाहून सगळेजण भावुक झाले. या शो मधील सगळे परीक्षक रडायला लागले. हे पाहून सगळा मंच सुन्न झाला. यांनतर सुनील शेट्टी मंचावर आला आणि त्याने पृथ्वीराजला मिठी मारली आणि म्हणाला, “मला असं वाटत आहे की, या शांततेने सर्व काही सांगितले आहे. जेव्हा आम्ही बॉर्डर हा चित्रपट शूट करत होतो, तेव्हा हाच जोश होता, आम्ही अभिनय केला नव्हता.” या एपिसोडचे प्रेक्षेपन या आठवड्याच्या शेवटी केले जाणार आहे.

सुनील शेट्टीने हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर उभे राहून‌‌ त्यांना सलाम देखील केले. त्याचा ‘बॉर्डर’ हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याने सैनिकाचे पात्र निभावले होते, जो युद्धात शहीद होतो. या चित्रपटात सनी देओल, अक्षय खन्ना आणि जॅकी श्रॉफ सारखे आणखी काही कलाकार होते. बॉर्डरवर सैनिकांचे आयुष्य कसे असते, याबाबत भाष्य करणारा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील ‘संदेसे आते है’ हे गाणे तर खूप प्रसिद्ध झाले होते. हे गाणे ऐकून कोणीही भावुक होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा