बॉलिवूडचा अण्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीने त्याच्या हिंमतीवर या ग्लॅमर जगात नाव कमावले. ९० च्या दशकातील सुपरस्टार आणि ऍक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनीलने अनेक दमदार सिनेमे केले. त्याने त्याच्या ‘बलवान’ या पहिल्याच सिनेमात ऍक्शन हिरोची भूमिका साकारली आणि पुढे ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘गोपी किशन’, ‘बॉर्डर’ आदी चित्रपटांमध्ये देखील त्याने ऍक्शनचं केली. मात्र मध्ये कुठेतरी माशी शिंकली आणि त्याची लोकांमध्ये जाणारी क्रेझ लोकप्रियता हळूहळू कमी झाली. यासर्व गोष्टींमुळे खुद्द सुनील देखील हा विचार करू लागला नक्की असे झाले तरी काय की अचानक एवढा मोठा फरक त्याच्या लोकप्रियतेत पडला. सुनीलने २० वर्षांपूर्वी असे काही सिनेमे केले ज्यांमुळे त्याला मोठे नुकसान भोगावे लागले. सुनीलने एकदा तर असा विचार केला की, ऍक्शन हिरोच्या इमेजमधून बहर पडत कॉमेडी करावी का?
सुनीलने काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मला शिकण्याची खूपच चांगली संधी मिळाली. आज जेव्हा मी माझे जुने सिनेमे बघतो तेव्हा मला वाटते की, ते सर्व सिनेमे मिटवून टाकू आणि पुन्हा नव्याने बनवू. तेव्हा तर मी नुकतेच इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. मी तेव्हा एका लहान मुलासारखा होतो. जसे लहान बाळ रंगायला लागते, पडते उठते, चालते. अशा करतो की, मी लवकरच पाळायला लागेल. मी नेहमीच माझे आगामी सिनेमा मागील चित्रपटापेक्षा अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करत असतो.”
पुढे सुनील शेट्टी म्हणाला, “१० वर्षांचा काळ खूप मोठा असतो. माझ्याकडे चान्गले वाईट असे अनेक अनुभव आहे. जीवनातील प्रत्येक चढ आणि उत्तर तुमहाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवते. मी आता कॉमेडी करू इच्छितो कारण तो माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. माझ्या मित्रांना माझ्यासोबत बाहेर यायला यासाठीच आवडते की, मी सतत हसत असतो. मी कॉमेडी करू शकतो हे मला माहित आहे. मात्र मार्शल आर्ट बॅकग्राउंड असल्याने मला ऍक्शन हिरोच्या भूमिका मिळाल्या. तुम्ही ज्यात यशस्वी होतात त्याच भूमिका तुम्हाला पुढे मिळतात.”
सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारने सोबतच काम करायला सुरुवात केली. या दोघांनी सोबत मोहरा, वक्त हमारा है, हेराफेरी आदी अनेक सिनेमे केले. आज अक्षय एक सुपरस्टार आहे, तर सुनील मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?