Tuesday, October 14, 2025
Home वेबसिरीज ‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

बॉलिवूडमधील लोकप्रिय, प्रसिद्ध आणि फिटनेसप्रेमी अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. ९० च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सुनीलचा मोठा बोलबाला होता. आजही सुनील मुख्य भूमिकेत दिसत नसला तरी तो मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसतो. आता सुनील शेट्टी लवकरच एका नवीन वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. ‘हंटर- टूटेगा नहीं तोड़ेगा’ या सिरीजमधून तो बऱ्याच काळानंतर अभिनय करताना दिसणार आहे. सध्या तो या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान त्याने त्याचा जवळचा मित्र असलेल्या सलमान खानबद्दल त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे.

सुनील शेट्टीने एका मुलाखतीमध्ये सलमान खानसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केले आहे. त्याला त्याच्या आणि सलमानच्या नात्यावरून प्रश्न विचारला गेला आणि त्यावर उत्तर देताना सुनील म्हणाला, “आज सलमान खानचा एक ऑरा आहे, त्यामागे केवळ त्याचे स्वच्छ मन आहे. जे सलमानच्या अतिशय जवळ आहे, आणि जे त्याला ओळखतात त्यांना माहित आहे की, त्याच्याकडे कधीही काहीही मागितले तरी तो लगेच देतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

पुढे सुनील म्हणाला, “आमची मैत्री खूपच खास आहे. आम्ही रोज भेटत नाही. मात्र जर मी त्याला आता फोन केला तर तो लगेच म्हणेल अण्णा कुठे आहे, मी येतो तुझ्याकडे. असेच मी देखील त्याच्यासोबत करतो. आमची मैत्री ही फक्त स्वार्थी नाही. सलमानला मी आणि त्याने मला आमच्या सुरुवातीच्या काळात पडत्या काळात खूप मदत केली आहे. मैत्रीत जाणीव पाहिजे आणि ती आम्हाला दोघांनाही आहे.”

दरम्यान सुनील शेट्टीची आगामी वेबसिरीज ‘हंटर- टूटेगा नहीं तोड़ेगा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ही सिरीज २२ मार्च रोजी अमेझॉनच्या मिनी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागणीवर कैलाश खेर यांनी साेडले माैन; म्हणाले, ‘हिंदू जागृत होत आहे’

‘हिंदुत्व खोट्यावर आधारित’ हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला अटक

हे देखील वाचा