Wednesday, March 11, 2026
Home बॉलीवूड हार्ट सर्जरीनंतर पहिल्यांदाच दिसला सुनील; रुग्णालयातून बाहेर येताच कॉमेडियनने ‘असे’ जिंकले चाहत्यांचे मन

हार्ट सर्जरीनंतर पहिल्यांदाच दिसला सुनील; रुग्णालयातून बाहेर येताच कॉमेडियनने ‘असे’ जिंकले चाहत्यांचे मन

आपल्या कॉमेडीने सर्वांना हसायला पोट धरून हसवणारा हास्य अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच सुनील ग्रोव्हर होय. तो मागील अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, आता त्याला रुग्णालयातून घरी सोडल्याने त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला (Sunil Grover) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अलीकडेच, सुनीलला हार्ट ब्लॉकेज असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याला मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या बातमीने त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला होता. त्यामुळे ते त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत होते.

आता सुनील ग्रोव्हरची तब्येत बरी असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे समजताच चाहत्यांना आनंद झाला आहे. तो शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच समोर आला असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वूम्प्लाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर हॉस्पिटलमधून बाहेर पडत आपल्या कारमध्ये जाताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सुनील आपल्या चाहत्यांसाठी हात उंचावताना दिसत आहे आणि पॅपराजींकडे पाहताना तो दोन्ही हातांनी फ्लाईंग किस देताना दिसत आहे. यामुळे त्याने चाहत्यांचे मन पुन्हा एकदा जिंकले आहे. यावरून त्याचे आणि त्याच्या चाहत्यांचे नाते किती प्रेमळ आहे, याचीच प्रचिती येते. या आजारामुळे तो दीर्घकाळ काम करत नव्हता. आशिष विद्यार्थी, रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी आणि मुकुल चढ्ढा यांच्यासोबत झी५ वेबसीरिज ‘सनफ्लॉवर’मध्ये सुनील ग्रोव्हर शेवटचा दिसला होता. तसेच तो गेल्या वर्षी सैफ अली खानसोबत ‘तांडव’ या वेबसीरिजमध्येही दिसला होता.

सुनील अखेरचा मोठ्या पडद्यावर सलमान खान आणि कॅटरिना कैफसोबत ‘भारत’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने सलमानच्या मित्राची भूमिका साकारली होती. दरम्यान सुनील च्या कॉमेडीची नेहमीच सर्वत्र चर्चा होताना दिसत असते. आपल्या अफलातून विनोदाने तो नेहमीच प्रेक्षकांना पोट धरून हसायला लागतो.

हेही वाचा-

हे देखील वाचा