Friday, July 5, 2024

Viral Video : ‘तेरी आंख्या का काजल’ गाण्यावर काकांचा पार जमीनीवर लोळून डान्स, आख्खी फरशी साफ केली

सपना चौधरी (Sapna Choudhary) ही एक हरियाणवी स्टार आहे आणि तिची आजवर आलेली सर्व गाणी जबरदस्त हिट ठरली आहेत. पण तिचे एक गाणे होते, जे खूप वर्षांपूर्वी हिट होते, ते आजही हिट आहे आणि पुढील अनेक वर्षेही हिट राहील. हे गाणे दुसरे तिसरे काही नसून, तुमचे आवडते ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे आहे.

सपना चौधरीने या गाण्यावर हजारो वेळा परफॉर्मन्स दिला आहे. सपनाचे चाहतेही या गाण्यावर नाचताना थकत नाहीत. आजही हे गाणे लग्नसमारंभात वाजणाऱ्या डीजेच्या ट्रॅक लिस्टमध्ये समाविष्ट आहे. हे गाणं वाजलं की, कोणाला नाचायला येवो किंवा न येवो, त्यांचे पाय थरथरायला लागतात. पण आज आम्ही तुम्हाला जो डान्स दाखवणार आहोत, तसा डान्स तुम्ही क्वचितच या गाण्यावर कोणाला तरी करताना पाहिले असेल. (sunil grover share hilarious video of a man who dance on sapna choudhary song teri aankhya ka yo kajal)

सुनील ग्रोवरने शेअर केला मजेदार व्हिडिओ
कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरने (Sunil Grover) हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये काही कलाकार स्टेजवर सपना चौधरीच्या या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पण नंतर एक व्यक्ती सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेते. त्याचा डान्स पाहून प्रत्येकजण दंग होतो आणि मग तो असे काही करतो की, पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.

सुनील ग्रोव्हरने शेअर केलेल्या या व्हिडिओवर सपना चौधरीनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने यावर खूप हसणारे इमोजी शेअर केले.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
सुनील ग्रोव्हरने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर, त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सपना चौधरीचे हे गाणे जबरदस्त हिट झाले असून, या गाण्याचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत.

हेही वाचा

हे देखील वाचा