Tuesday, July 9, 2024

सुनील ग्रोवर करतोय आर्थिक संकटाचा सामना ? उसाचा रस काढल्यानंतर दिसला रस्त्यावर चहा विकताना

 सुनील ग्रोवर (Sunil Grover)  हा हिंदी चित्रपट जगतातला एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या खास विनोदी शैलीने आणि अभिनयाने त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या अभिनयाचे आणि कॉमेडीचे प्रचंड चाहते आहेत. कधी रिंकू भाभीच्या भूमिकेत, तर कधी डॉ.गुलाटीच्या भूमिकेत प्रत्येकवेळी त्याने चाहत्यांना पोट धरुन हसायला लावले आहे. त्यामुळेच त्याच्यावर प्रेक्षक फिदा असतात. मात्र अभिनेता सुनील ग्रोवरची आणखी एक विशेष बाब म्हणजे त्याचा साधेपणा. यशाच्या शिखरावर असूनही तो अनेकदा आपल्या सहजकृतीने चाहत्यांची मने जिंकत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा रस्त्यावर ऊसाचा रस काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा सुनीलचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो छोट्या टपरीवर चहा करताना दिसत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सुनील ग्रोव्हरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुनीलने टी-शर्टवर पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह शर्ट आणि डोक्यावर गोल टोपी घातलेली दिसत आहे. सुनील एका चहाच्या स्टॉलवर चहा बनवताना आनंद घेत आहे, ज्यामध्ये त्याने कशाप्रकारे चहा बनवला ते दिसत आहे. सुनीलचा हा साधेपणा नेटकऱ्यांना खूप भावल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून सुनीलच्या कॉमेडी टायमिंगचे ते कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “तुम्ही खरे कलाकार आहात, तुम्ही काहीही न बोलता हसवता.” त्याचवेळी एका यूजरने म्हटले की,”सर तुम्हाला पुन्हा कॉमेडी शोमध्ये बघायचे आहे.” त्याचवेळी काही चाहते त्याच्या या व्हिडिओची खिल्ली उडवत, “कपिलचा शो सोडल्यानंतर त्याने चहाचा स्टॉल उघडला आहे का?” असा प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान अभिनेता सुनील ग्रोवरचा याआधीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो ऊसाच्या गाड्यावर रस बनवताना दिसला होता. त्याच्या या व्हिडिओचे चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले होते. सुनील कपिल शर्माच्या कार्यक्रमात केलेल्या भूमिकेने या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याच्या अभिनयानेच या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. मात्र कपिल शर्मासोबतच वाद झाल्यानंतर त्याने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. सुनीलने अनेक चित्रपटातही आपल्या अभिनयाची धाप पाडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा