संपूर्ण देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. यातच सर्वजण नागरिकांना नियम पाळा असे वारंवार सांगत आहेत. अनेक कलाकार देखील सोशल मीडियाद्वारे जागरूकता वाढवत आहेत, तर काही कलाकार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकताच कॉमेडियन सुनील पालने डॉक्टरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे तो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सुनीलने डॉक्टरांना राक्षस आणि चोर असे म्हटले होते. यानंतर त्याला खूप प्रतिक्रिया आल्या होत्या.
त्याच्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. यांनतर तो एक पाऊल मागे आला, आणि त्याने त्याच्या या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे. त्याने माफी मागत सांगितले की, त्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता.
सुनील पाल विरुद्ध मानहानीचा दावा केला होता. यांनतर तो आता सगळ्या डॉक्टरांची माफी मागताना दिसत आहे. त्याने ट्विटरवर ट्वीट करून माफी मागितली आहे. या ट्वीटमध्ये त्याने गृहमंत्री अमित शाह, पीएमओ, एम्स डॉक्टर्स असोसिएशन, सीए महाराष्ट्र यांना टॅग केले आहे.
Sorry doctor's ???????????????? #doctorsaresaviours #AIIMS @AmitShah @AmitShahOffice @PMOIndia @ANI @ndtv @ndtvindia @ABPNews @AIIMSRDA @AMCMUMBAI @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @rajeshtope11 @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra :- https://t.co/X1sE39oEgQ pic.twitter.com/0U72sOIviU
— Sunil Pal Comedian (@iSunilPal) May 5, 2021
सुनील पालने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून म्हटले होते की, “अनेक डॉक्टर चोर आहेत आणि ते गरीब रुग्णांची मदत करत नाहीत.” यानंतर अंधेरी पोलिसांनी एका डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होती. यानंतर मात्र सुनीलने सगळ्या डॉक्टरांची माफी मागितली आहे.
त्याने माफी मागताना म्हटले आहे की, “जर माझ्या व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागत आहे. पण तरीही मी माझ्या मतावर कायम आहे. डॉक्टर हे देवासमान आहेत. परंतु या कठीण प्रसंगात देखील अनेक डॉक्टर गरीब जनतेला सहकार्य करत नाहीयेत.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल
-काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल