Saturday, June 29, 2024

शतक ठोकल्यानंतर सुनील शेट्टीने केली केएल राहुलची प्रशंसा; नेटकरी म्हणाले, ‘पहिल्यांदाच सासऱ्याने जावयाची…’

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय संघाचा क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. आपापल्या सोशल मीडिया हँडलवर एकमेकांचे फोटो शेअर करतात. मात्र, अथिया आणि राहुलने अद्यापही एकमेकांना डेट केल्याची गोष्ट अधिकृतपणे स्वीकारलेली नाही.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते बारीक नजर ठेवतात. जेव्हा ते एकमेकांच्या पोस्ट शेअर करतात, तेव्हा त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात. अनेक वेळा त्यांची पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारीच असते.

लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात राहुलने शानदार शतक झळकावले आहे. या शानदार डावासाठी राहुलची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला आणि ट्वीट ही केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून राहुलचे कौतुकही केले आहे. त्याने व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले, “क्रिकेटच्या मक्कामध्ये शतक. अभिनंदन, देवाचे आशीर्वाद तुझ्यावर कायम राहो, केएल राहुल. माझ्या वाढदिवसाच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद.”

राहुल आणि अथिया शेट्टीच्या चाहत्यांनी सुनील शेट्टीच्या ट्विटवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये एकापेक्षा जास्त इमोजी शेअर करून त्यांचे मनमोकळे केले आहे. चाहत्यांनी राहुल आणि अथिया यांच्यातील संबंधांबद्दल थेट चर्चा केली आहे.

एका ट्विटर युजर्सने सुनील शेट्टीला थेट विचारले आहे, “तर हे नातेसंबंध नक्की खरे आहेत का?” आणखी एका युजरने अभिनेते आलोकनाथ यांचा फोटो शेअर केली आहे. आणि विचारले आहे की, “तर मी हे नाते नक्की समजू का?”

रत्नीश नावाच्या ट्विटर युजरने लिहिले आहे की, “आता लग्न ठरले आहे.” एका युजरने ट्विटमध्ये लिहिले की, “मानवजातीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सासऱ्याने जावयाची जाहीरपणे स्तुती केली आहे.”

सुनील शेट्टीबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवटचा ‘मुंबई सागा’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, इमरान हाश्मी हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बचपन का प्यार’ गाण्यावर थिरकल्या सोनाली कुलकर्णी अन् प्रार्थना बेहेरे, पाहायला मिळाली मजेदार केमिस्ट्री

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

-Bigg Boss OTT: दिव्या अग्रवालने रागाच्या भरात बादली घेऊन केला रिद्धिमावर हल्ला, तर तिने…

हे देखील वाचा