हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुनील शेट्टीचा समावेश होतो. सुनीलला ऍक्शन आणि कॉमेडी चित्रपटासाठी ओळखले जाते. आता सुनील शेट्टीच्या पावलांवर पाऊल टाकत त्याचा मुलगा अहान शेट्टीदेखील बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनरखाली बनलेल्या ‘तडप’ या चित्रपटातून अहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अशातच नुकतेच निर्मात्यांनी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. टिझरसोबतच या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करण्याची तारीखही सांगितली आहे.
यासंदर्भात ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी ट्रेलर प्रदर्शित करण्याच्या तारखेचाही खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, “अहान शेट्टीच्या ‘तडप’ या पदार्पण चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी (२७ ऑक्टोबर) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अहान शेट्टीसोबत अभिनेत्री तारा सुतारिया रोमान्स करताना दिसणार आहे.” (Sunil Shetty Son Ahan Shetty And Tara Sutaria Film Tadap Teaser Has Been Out)
'TADAP' TRAILER ARRIVES TOMORROW… And here's #TaraSutariaTeaser… #TadapTrailer – starring #AhanShetty [son of #SunielShetty] and #TaraSutaria – drops tomorrow [27 Oct 2021]. #Tadap pic.twitter.com/I1XPG5SO4y
— taran adarsh (@taran_adarsh) October 26, 2021
‘तडप’ चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या एका टिझरमध्ये ताराचा सुंदर अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच दुसऱ्या टिझरमध्ये सुनील शेट्टीचा लाडका लेक अहान दमदार अंदाजात दिसत आहे. टिझरमध्ये अहान शेट्टीला पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, तो देखील आपल्या वडिलांप्रमाणेच ऍक्शन मोडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार आहे.
Introducing our next #NGETalent #AhanShetty as Ishana! Witness his raging love in #SajidNadiadwala's #Tadap ????@TaraSutaria @milanluthria @rajatsaroraa @ipritamofficial @foxstarhindi @WardaNadiadwala #FoxStarStudios @TSeries pic.twitter.com/K8bjt1r2AB
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) October 26, 2021
तारा आणि अहान अभिनित ‘तडप’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी (२७ ऑक्टोबर) जवळपास १ वाजता प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देशभरात ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘तडप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे.
तारा ‘तडप’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हिरोपंती २’मध्येही झळकणार आहे. ताराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करण जोहर निर्मित ‘स्टुडंट ऑफ द इयर २’मधून केली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. असे असले, तरीही ताराच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली.
ताराने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ नंतर ‘मरजावां’ या चित्रपटात काम केले होते. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’
-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?
-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण