Friday, February 3, 2023

विवाहित असूनही अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता सनी देओल, प्रेम प्रकरणांची होती भलतीच चर्चा

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या चित्रपटांंमुळे तर गाजलेच मात्र यापेक्षाही जास्त त्यांच्या कथित प्रेम प्रकरणांची सर्वात जास्त चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने अभिनेता सनी देओलचे नाव घेतले जाते. सनी देओल(Sunny Deol) हा हिंदी चित्रपट जगतातील एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. सनीच्या चित्रपटांची आजही सर्वत्र चर्चा होत असते. अभिनेता सनी देओल जितका त्याच्या चित्रपटांमुळे गाजला तितकाच त्याच्या प्रेमप्रकरणाचीही सर्वात जास्त चर्चा झाली होती. विवाहित असूनही सनी देओल आणि डिंपल कपाडियाचे (Dimple Kapadia) प्रेमप्रकरण त्या काळात चांगलेच गाजले होते. जाणून घेऊ या सनी देओलच्या प्रेमप्रकरणाचे हे गाजलेले किस्से. 

नव्वदच्या दशकातील सर्वात यशस्वी आणि गाजलेला अभिनेता म्हणून सनी देओलच्या नावाची चर्चा होत असते. आपल्या दमदार अभिनयाने सनीने त्या काळात जोरदार लोकप्रियता मिळवली होती. सनी देओलने 1983मध्ये आलेल्या ‘बेताब’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमृता सिंगने काम केले होते. या चित्रपटामुळे दोघांच्यात चांगलीच जवळीकता निर्माण झाली होती. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चाही रंगली होती. मात्र जेव्हा अमृताला सनी देओल विवाहित असल्याचे समजले तेव्हा तिने त्याच्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेता सनी देओलने चित्रपट जगतात पाऊल ठेवण्याआधीच लग्न केले होते. मात्र या गोष्टीचा त्याच्या करिअरवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून  त्यांनी ही गोष्ट लपवली होती.

अमृता सिंगसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर सनीच्या आयुष्यात डिंपल कपाडियाची एंट्री झाली. त्यावेळी विवाहित असलेली डिंपल पती विनोद खन्नापासून लांब राहत होती. याच काळात तिची आणि सनी देओलची लवस्टोरी रंगात आली होती. दोघांनी ‘मंजिल मंजिल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. याच काळात त्यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. इतकेच नव्हेतर दोघांनी गुपचूप लग्नही केले होते. मात्र या सगळ्या प्रकरणाचा सुगावा सनी देओलच्या पत्नीला म्हणजे पूजा देओलला लागला आणि तिने मुलांना घेऊन निघून जाण्याची धमकी सनीला दिली होती. त्यामुळे सनी देओलने त्याच्या फॅमिलीला प्राधान्य देत डिंपलसोबतचे नाते संपवले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
सनी देओल आणि डिंपल कपाडियाचे अफेअर एवढे गाजले होते की, अभिनेत्रीची मुले देखील त्याला म्हणायचे ‘छोटे पप्पा’
स्वत:च्या सिनेमाच्या प्रीमिअरला जाण्यापूर्वी भीतीने थरथर कापत होता सनी देओल, काय होतं कारण?

हे देखील वाचा