Friday, July 5, 2024

मुंबई ते मनाली व्हाया कोरोना पॉझिटिव्ह! बॉलिवूडच्या ‘गदर बॉय’ला कोरोनाने गाठलं; चाहत्यांकडून देवाकडे प्रार्थना

भारतीय जनता पक्षाचे खासदार तसेच बॉलिवूडचा ‘गदर बॉय’ अशी ओळख असणारे अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी मंगळवारी रात्री याबद्दल माध्यमांना माहिती दिली. सनी देओल यांना ताप आणि घशाला खवखव होत असल्याने त्यांनी कोव्हिडची चाचणी केली होती.

गुरुदासपूर येथून खासदार पदी निवडून आलेले बॉलिवूड अभिनेते सनी देओल हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनाली येथील फार्महाऊस वर राहत होते. यादरम्याण त्यांना ताप आणि घशाला खवखव जाणवत असल्याने त्यांनी कोव्हिडची चाचणी करून घेतली होती. जीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती, हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्य आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी माध्यमांना दिली.

चौसष्ट वर्षीय सनी देओल यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत हाताची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आराम करण्यासाठी म्हणून ते आणि त्यांचे मित्र हे मनालीला फार्महाऊसवर राहायला गेले होते. दिनांक ३ डिसेंबर रोजी ते मुंबईकरिता रवाना होणार होते, त्यात त्यांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली.

कोरोनाची लागण होणारे सनी देओल हे काही पहिलेच सेलिब्रिटी नाहीत. त्यांच्या अगोदर देखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तसेच त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना देखील कोरोना झाला होता. त्यातून ते सुखरूप बरेही झाले आहेत. त्यामुळे आता सनी देओल देखील कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.

हे देखील वाचा