आपल्या मादक अदांनी सर्वांना नेहमी घायाळ करणारी बेबी डॉल अर्थातच सनी लिओनी. कमनीय बांधा, मोहक रूप आणि दिलखेचक हावभाव यांच्या जोरावर तीने आपला चाहतावर्ग टिकून ठेवला आहे. सनी दररोज आपले हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, जेणेकरून चाहत्यांना तिच्या नवीन लुकचे दर्शन होईल. तिचा एम टीव्हीवर सुरू असलेला डेटिंग रियालिटी शो ‘स्प्लिट्सविला’ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सनी रणविजय सिंह सोबत स्प्लिट्सविला या शोचे होस्टिंग करत असते. वर्षानुवर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि या कार्यक्रमाने अनेक तरुणांच्या हृदय व मनामध्ये स्थान निर्माण केला आहे. येत्या ६ मार्चपासून दर शनिवारी सायंकाळी सात वाजता स्प्लिट्सविलाचा नवीन सीजन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
नुकताच या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी सनी लिओनीने एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तिचे ते रूप पाहून अनेकांची विकेट पडली आहे. यामधील तिचा हॉटनेसचा जलवा पाहून तुमचेही डोळे फिरतील. सध्या हा फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे, ज्यात केरळमधील पूर्व आयर्लंडच्या ठिकाणी आणि दाट जंगलामध्ये एका होडीवर सनी आपला हॉटनेसचा तडका लावत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही प्रेमाच्या दोन पैलूंचे दर्शन घेण्यास तयार आहात का ? त्यासाठी आपला आवडता कार्यक्रम स्प्लिट्सविला येत्या शनिवार पासून सुरू होणार आहे.”
रणविजय सिंह आणि सनी लिओनी ही जोडी सातव्यांदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यास तयार आहे. नवनवीन थिम्स आणि आव्हानात्मक स्पर्धकांचा वैविध्यपूर्ण अविष्कार या कार्यक्रमात पहावयास मिळतो. तसेच प्रत्येक पर्वामध्ये आपल्या प्रेमावरील विविध पैलूंना सादर करणे असे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या नवीन हंगामात प्रथमच प्रेमाचे ‘टू साइट्स ऑफ लव्ह’ पाहण्यास मिळतील. या कार्यक्रमाचे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्यांदाच लाईव्ह ऑडिशन झाले होते आणि प्रेक्षकांनी सुद्धा या गोष्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
सनी आपल्या वेगवेगळ्या फोटोमार्फत नेहमीच चाहत्यांच्या भेटीला येत असते. बिकीनी मधला फोटो असो वा एखाद्या साडीवरील. तिच्या प्रत्येक अदा या चाहत्यांना भांबावून सोडत असतात. नुकताच सनीच्या पांढरा रंगाचा वेडिंग गाऊनमधला फोटो खूपच ट्रोल होत होता, ज्याला तिने माझ्याशी लग्न करा असं कॅप्शन दिलं होतं. त्यावेळी त्या फोटोमधून तिला अनपेक्षित अशा कमेंट्स सामना करावा लागला होता. आपल्या प्रत्येक फोटोमार्फत ती नेहमीच सर्वांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असते.
सन २०१२ मध्ये सनीने ‘जिस्म टू’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु ती प्रकाशझोतात आली ती बिगबॉसच्या पाचव्या पर्वात आणि तेव्हाच तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटात तिने आइटम सॉंग देखील केले आहे. केवळ हिंदीच नव्हे तर तमिळ तेलुगू मल्याळम बंगाली आणि नेपाळी अशा अनेक भाषांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चमक दाखविली आहे.
तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं होतं ती अपकमिंग हॉरर कॉमेडी चित्रपट कोकाकोला या चित्रपटात दिसणार आहे. सोबतच रंगीला आणि विरमादेवी आधी चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.