Saturday, June 29, 2024

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने समुद्रकिनारी बिकिनीत दिली हटके पोझ; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘कमालच ना!’

बॉलिवूडची ‘बेबी डाॅल’ म्हणजे अभिनेत्री सनी लिओनी होय. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात सनी स्पर्धक म्हणून आली आणि ती भारताचीच झाली. बिग बॉसमध्ये जेव्हा पहिल्यांदा सनी आली, तेव्हा तिला पाहून अनेक प्रत्येकाच्या मनात काहीतरी नक्कीच झाले असेल. सनीने भलेही बिग बॉसचे विजेतेपद पटकावले नसेल. मात्र, तिने या शोच्या निमित्ताने स्वतःसाठी बॉलिवूडची दारे खुली केली होती. अभिनेत्री सनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रेक्षकांना तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात. त्यामुळे सनीचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. यावेळीही असेच काहीसे घडले आहे.

सनी या व्हिडिओत बिकिनी घालून समुद्रकिनारी मजा करताना दिसत आहे. ती समुद्रात धावताना दिसत आहे. तिने वाईन रंगाची बिकिनी परिधान करून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. नेहा कक्कर आणि हनी सिंग यांचे ‘सनी सनी’ हे गाणेही व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ऐकायला मिळत आहे. सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला तिने ‘बीच बेबी’ असे कॅप्शन दिले आहे.

याशिवाय तिने समुद्र किनाऱ्यावरील बिकिनीतील सुंदर फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये ती हटके पोझ देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “इथे कुठल्याही फिल्टरची गरज नाही.”

अलीकडेच सनी आपल्या कुटुंबासह मुंबईतील नवीन घरात शिफ्ट झाली आहे. काही काळापूर्वी सनीने तिच्या आगामी ‘शीरो’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट मल्याळम, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

खूप मेहनत घेऊन सनी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली आहे. सनीने तिच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत जरी कमी सिनेमे केले असले, तरी तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग्स केले आहेत. तिने तिच्या लूक्सने, तिच्या अंदाजाने आणि व्यक्तिमत्वाने करोडो चाहत्यांना वेड लावले आहे. सनी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली, तेव्हा तिला खूप ट्रोल देखील करण्यात आले होते. मात्र, तिने या सर्वांकडे दुर्लक्ष करत तिचे काम केले आणि आज तिने बाॅलिवूडसृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिवसेंदिवस तू सुंदर दिसत आहेस’, तेजश्री प्रधानच्या सुंदर फोटोवर चाहता घायाळ

-सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला पोहचली संभावना, ‘या’ कारणामुळे पोलिसांनी लगावली तिच्या पतीच्या कानशिलात

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

हे देखील वाचा