Saturday, June 29, 2024

जान्हवी कपूरच्या ‘नदियों पार’ गाण्यावरील व्हिडिओ सनी लिओनीने केला शेअर, म्हणाली ‘…तयार आहात का?’

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना वेड लावत असते. सनी क्वचितच चित्रपटांचा भाग राहिली आहे, परंतु तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वत: चे एक खास स्थान निर्माण केले आहे. सनी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या सौंदर्यामुळे अधिक चर्चेत असते.

नुकताच सनी लिओनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नाचताना दिसत आहे. सनीने एका विशेष कारणास्तव हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने फिल्मफेअरसाठी तयार राहण्यासाठी सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनी प्रथम जीन्स आणि टॉपमध्ये दिसली, त्यानंतर एका झटक्यात ती परिपूर्ण डान्सच्या ड्रेसमध्ये समोर येते. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये, जान्हवी कपूरच्या ‘रूही’ चित्रपटातील ‘नदियों पार’ हे गाणे वाजत आहे. अशाप्रकारे, सनीचा हा डान्स व्हिडिओ खूपच पसंत केला जात आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्सही येत आहेत.

सनी लिओनीच्या या व्हिडिओवर जवळपास दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सनी लिओनीने लिहिले आहे की, “तुम्ही फिल्मफेअरसाठी तयार आहात का?” तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.

सनी लिओनीने यापूर्वी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती एक मास्क लावून बोटमध्ये बसलेली दिसली होती. सनी लिओनीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “लॉकडाऊनमुळे जबरदस्ती घरी जावे लागत आहे. प्रत्येकजण सुरक्षित राहा.” अशा प्रकारे तिच्या या फोटोलाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले होते.

कामाबद्दल बोलायचे झाले, तर सनी सध्या डेटिंग रियॅलिटी शो स्प्लिट्सविलाचा 13 वा सिझन होस्ट करत आहे. रोडीजचा प्रसिद्ध होस्ट रणविजय सोबत ती या शोला होस्ट करत आहे. नुकताच तिने तिच्या ‘शेरो’ या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे, जो एक मनोवैज्ञानिक थ्रिलर आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजित विजयन यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

-‘संधी मिळेल तिथे डान्स करा!’, केरळच्या मेडिकल स्टुडंट्सनी लावले ‘या’ गाण्यावर ठुमके, पाहा जबरदस्त व्हिडिओ

-एकदम कडक! ‘टॉप टकर’ गाण्यावर थिरकली ‘नॅशनल क्रश’, वाढदिवसानिमित्त व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल

हे देखील वाचा