Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड आयुष्यात संतुलन महत्त्वाचे आहे, नाहीतर सनीसारखं चालता चालता पडाल स्विमींग पुलमध्ये

आयुष्यात संतुलन महत्त्वाचे आहे, नाहीतर सनीसारखं चालता चालता पडाल स्विमींग पुलमध्ये

बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सनी लियोनी ओळखली जाते. खूप कमी काळात तिने स्वतःचीही अढळ जागा या इंडस्ट्रीमध्ये तयार केली आहे. सनीने अनेक सिनेमांमध्ये ग्लॅमरस भूमिका साकारत फॅन्स आणि प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.

सनी नेहमीच सोशल मीडियावर भरपूर सक्रिय आहे. ती तिचे विविध फोटो, व्हिडिओ, माहिती नेहमी फॅन्ससोबत शेयर करत असते. सनीने नुकताच तिचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सनीने स्विमिंग पूलमध्ये पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

तिचा पूलमध्ये पडत असल्याचा हा व्हिडिओ कुठलाही स्टंट नसून तो एक फन व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सनीने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस, हाय हिल्स आई त्यावर गॉगल लावून एकदम कुल अंदाजमध्ये ती पूलमध्ये पडत आहे.
हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने दिलेले शीर्षकही मस्त आहे. सनी लिहिते, “खाली पडत असताना देखील तुमचे संतुलन आवश्यक असते.” सनीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही तासातच तो व्हायरल झाला आहे.

सनीने या पोस्ट आधी देखील पूलमध्ये निळ्या रंगाच्या बिकिनी आणि मोठी कॅप घातलेला एक फोटो पोस्ट केला होता. सनीच्या त्या फोटोच्या कॅपवर तिचे नाव लिहिलेले होते. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “जर कोणी माझे नाव विसरले तर.”

 

 

हे देखील वाचा