Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम

सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची ती एकही संधी सोडत नाही. प्रत्येक दिवशी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या वेळेस ती तिच्या चाहत्यांसाठी एक खतरनाक चॅलेंज घेऊन आली आहे. जे तिच्या चाहत्यांसाठी खूप कठीण आहे.

सनी लिओनी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लाईमलाईट मध्ये असते. या वेळेस ती चाहत्यांसाठी जे चॅलेंज घेऊन आली आहे. ते ऐकून तुम्हालाही घाम फुटेल. सनी लिओनीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती काहीतरी अवघड बोलत आहे. तिने जे बोलले आहे तेच ती तिच्या चाहत्यांना बोलण्याचे चॅलेंज देत आहे.

सनी लिओनी या व्हिडिओमध्ये बोलत आहे की, “रेड रोजेस फॉर रुबी, रेड रुबिज फॉर रोजी” या ओळी ती स्क्वाॅट करताना म्हणत आहे. तिने या ओळी चार वेळा म्हणल्या. त्यासोबत तिने विचारले की, तुम्ही या ओळी किती वेळा म्हणू शकता.

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या एमटीव्हीवरील स्पिल्टस्विला 13 या शोला होस्ट करत आहे. या सोबतच ती ‘शेरो’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचा टिजर 25 मार्चला प्रदर्शित झाला आहे.हा एक मानसशास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे.तिने अनेक वर्ष ऍडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. त्यांनतर तिने हे सगळे सोडून दिले. तिने भारतातील सर्वात विवादित रियॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतला. या शोमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये असतानाच पूजा भट्टने तिला ‘जिस्म 2’ या चित्रपटासाठी असाईन केले. या चित्रपटातील अनेक बोल्ड सीन्समुळे ती खूप चर्चेत आली होती. या नंतर तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

हे देखील वाचा