Friday, July 5, 2024

हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी स्वतःचे हटके अंदाजातील फोटो आणि लहान मुलांबरोबर मस्ती करतानाचे फोटो शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिची नवी झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. अशात सनीने नुकताच तिचा एक फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

यामध्ये ती एका स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. तिने यावेळी स्विमिंग सूट देखील घातला आहे. यामध्ये ती हॉट पोझ देताना दिसत आहे. हा स्विमिंग पूल सनीच्या घरामधील आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप पसंती दाखवली आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत हार्ट ईमोजी पाठवले आहेत. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुंबईमध्ये चांगल्या पावसाची सुरुवात आणि घरामध्ये या निसर्गाचा एक भाग असल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते.”

सनीने नुकतेच हे घर विकत घेतले आहे. हे घर मुंबईमधील अंधेरी पश्चिमेला अटलांटिस बिल्डिंगमध्ये आहे. यामध्ये ती १२ व्या मजल्यावर राहते. या घराची किंमत तब्बल १६ कोटी रुपये एवढी आहे. काही दिवसांपूर्वी तिने पती डॅनियल वेबरच्या कुशीत असताना या घराचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला होता. तिच्या या फोटोला देखील चाहत्यांचे प्रेम मिळाले.

तसेच काही दिवसांपूर्वी सनीचा आणखी एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती जमिनीवर लोटांगण घेताना दिसली होती. तसेच ती निर्मात्याचे पैसे वाचवत आहे, असे म्हणत होती. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यामुळे ते पूर्णपणे खराब झाले होते.

सनीच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘जिस्म २’, ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’, ‘वन नाईट स्टँड’, ‘तेरा इंतजार’ या चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

-भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

-Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

हे देखील वाचा