Saturday, June 29, 2024

सनी लियोनी निघाली नवरा डेनियल वेबरचा शोध घ्यायला, पाहा तिच्या शोधमोहिमेचे फोटो

सनी लियोनी बॉलिवूडमध्ये बाहेरून आली काय आणि इथे तिने स्वतःचे प्रस्थ स्थापित केले काय. बिग बॉस या शोमधून सनी सर्वांच्या नजरेत आली. अर्थात त्याआधी देखील ती तिच्या वेगळ्या कामांमुळे काहींना नक्कीच माहित असेल. मात्र बिग बॉसने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. या नंतर ती लोकांच्या नजरेत आली आणि तिला बॉलिवूडमध्ये संधी देखील मिळाली. आज सनी तुफान लोकप्रिय असून, तिचा जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटला देखील ५० मिलिअनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहे.

सोशल मीडियावरही सनी तुफान सक्रिय असते ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या पोस्टमुळे देखील ती अनेकदा प्रकाशझोतात येत असते. नुकतेच सनीने इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले असून, हे फोटो कदाचित तिच्या सुट्ट्यांचे आहे. या फोटोंमध्ये सनी एका मिशनवर असल्याचे तिने सांगितले आहे.

सनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्राच्या खाली पोहताना दिसत आहे. हे फोटो तिने तिच्या नवऱ्याला डेनियल वेबरला देखील टॅग केले आहे. जलपरी सारखी सनी पाण्याखाली पोहताना दिसत असून, या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले की, “डेनियल वेबरला शोधताना”. सनीचे हे फोटो अतिशय स्टायलिश आणि आकर्षक अंदाजात असून, सनीचा लूक देखील सर्वांना आवडताना दिसत आहे. या फोटोंमध्ये सनीने निळ्या रंगाची बिकिनी घातली असून, यावर तिने स्विमिंग गॉगल देखील लावलेले दिसत आहे.

हे फोटो सनीच्या मालदीवच्या व्हॅकेशनचे असल्याचे दिसत आहे. नुकतीच सनी डेनियल वेबरसोबत मालदीवला सुट्ट्यांसाठी गेली होती. सोशल मीडियावर सनीचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या अमाप कमेंट्स येत असून, सर्वांनाच सनीचा हा अंदाज खूप आवडत आहे. अतिशय कमी वेळात सनीच्या या फोटोना दोन लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

सनीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच विक्रम भट्ट यांच्या ‘अनामिक’ या वेबसिरीजमध्ये दिसणार असून ही सिरीज एम एक्स प्लेयर रिलीज होणार आहे. यासोबतच ती सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘शेरो’मध्ये देखील दिसणार आहे. ‘द बैटल ऑफ भीमा कोरेगांव’ या पिरियड ड्रामा आणि ‘पत्ता’ सिनेमात ती महत्वाच्या भूमिकेत दिसेल.

हेही वाचा :

हे देखील वाचा