बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सनी इतर अभिनेत्रींप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती देखील तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांशी जोडून राहत असते. नुकताच सनीने तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.या व्हिडिओमध्ये बेबी डॉल या गाण्यावर ती जबरदस डान्स करताना दिसत आहे. सनीने हा डान्स व्हिडिओ तिचा इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सनीने शेअर केलेला हा डान्स व्हिडिओ फिल्म फेअर अवॉर्ड 2021 मधील तिच्या डान्सची एक झलक आहे. तिच्या या व्हिडिओला ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. फिल्म फेअर अवॉर्ड 11 एप्रिलला टेलिकास्ट केला जाणार आहे. फिल्म फेअर अवॉर्डमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. यातच अनेक कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स झाले आहे. अनेक कलाकारांनी त्यांचे डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे यामध्ये ‘जिस्म 2’, ‘वन नाईट स्टॅन्ड’, ‘रागिनी एमएमएस 2’, ‘एक पहेली लीला’ या चित्रपटात तिने काम केले आहे.
सोशल मीडियावर सनीच्या चाहत्यांची संख्या भरपूर आहे. तिचे 44.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. सनी लवकरच विक्रम भट्ट यांच्या ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. तसेच ती हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ या चित्रपटात दिसणार आहे. सनी बिग बॉसमध्ये आल्यापासून तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालेली दिसून येते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी