बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहत असते. ती तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या फोटो व व्हिडिओंद्वारे चाहत्यांची मने जिंकत असते.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमुळे तिच्या चर्चेला उधाण आले आहे. अभिनेत्री सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती हॉटेलच्या रूममध्ये मजा करताना दिसत आहे. सनीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. लाईक्सच्या माध्यमातून तिला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
हा व्हिडिओ सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले आहे की, “5 महिन्यात मी पहिल्यांदाच एकटी आहे. असे पहिल्यांदाच झाले की, मी माझ्या पलंगावर 30 सेकंदापर्यंत उड्या मारत राहिले. मी खूप खुश होते.” व्हिडिओमध्ये सनीने पांढऱ्या रंगाचे बाथ रॉब परिधान केले आहे.
व्हिडिओमध्ये सनी मिरर सेल्फी घेत, चाहत्यांशी बोलत आहे. ती सांगत आहे की, बऱ्याच काळानंतर ती एकटी आहे. सनीच्या या व्हिडिओवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्स देऊन आपले प्रेम व्यक्त करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर बऱ्याच युजर्सने रेड हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करून तिचे कौतुक केले आहे.
सनी लिओनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच विक्रम भट्टच्या अॅक्शन सीरिज ‘अनामिका’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय सनी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ यातही दिसणार आहे. ती सध्या टीव्हीचा लोकप्रिय रियॅलिटी शो स्प्लिट्सविला 13 सिझनच्या होस्टसाठी तयार आहे. सनीने 7 सीझनपासून या शोचे होस्टिंग केले आणि अजूनही ती करत आहे. शोमध्ये सनीची होस्टिंग प्रेक्षकांना खूप आकर्षित करते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर
-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग