बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियाला आग लावते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सनी नेहमी फोटो आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. अशातच सनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. ती या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे .
चाहत्यांना सनीची प्रत्येक पोस्ट खूप आवडते, परंतु शुक्रवारी (२९ऑक्टोबर) सनीने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या लहान चाहत्याबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला आहे. हा व्हिडिओ ‘वन माइक स्टेज’ या शोच्या नवीन सीझनमधील आहे, ज्यात तिने सांगितले की, एक आई त्याच्याकडे एका लहान मुलीला घेऊन आली होती आणि म्हणू लागली की, “फोटो काढा, ही तुमची चाहती आहे.” या फॅनला पाहून सनी खूप खुश झाली.
हा व्हिडिओ शेअर करताना सनीने एक किस्सा शेअर केला आहे. सनी म्हणाली की, “एक आई तिच्या बाळाला घेऊन माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ही तुमची चाहती आहे. तुम्ही हिच्यासोबत फोटो काढा.” सनी यावर हैराण झाली आणि म्हणाली की, “फॅन कुठून? तिला माहित आहे का की, मी कोण आहे ?” त्यानंतर पुढे सनी म्हणाली की, “मी या क्यूट बाळाला इतकंच सांगेल की, कॅप्टन अमेरिका पाहा, नॉटी अमेरिका नको पाहु.” तसेच हा व्हिडिओ शेअर करताना सनीने लिहिले की, “मी माझ्या प्रिय फॅनला चुकुन भेटली आहे.”
सनी लिओनी बद्दल बोलायचं झाले, तर सनी अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत असते. सनीने ९ एप्रिल २०११ रोजी डॅनियल वेबरशी लग्न केले. या दोघांना तीन मुले आहेत. सनीने एक मुलगी दत्तक घेतली आहे. जिचे नाव तिने निशा कौर ठेवले आहे. तर तिला दोन जुळी मुले नोहा आणि आशेर आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्टायलिश साडी नेसून सनीने वाढवला सोशल मीडियाचा पारा; फोटोशूटदरम्यान मस्ती करताना दिसली ‘बेबी डॉल’
-सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर
-हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’