अभिनेत्री सनी लिओनीने खूप कमी कालावधीत आपल्या कामाने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. बॉलिवूड सोबत तमिळ, तेलुगू भाषांमध्ये देखील तिने काम केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या सगळ्या सोबत सनी मराठी चित्रपट सृष्टीत देखील झळकली आहे. तिने ‘बॉयज’ या चित्रपटातील ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ या गाण्यावर डान्स करून मराठी चाहत्यांना घायाळ करण्याची संधी सोडली नाही. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, सनी पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होय अगदी खरं आहे की, सनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा एकदा झळकणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सनी संजीव राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या चित्रपटात ‘शांताबाई’ गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. या गाण्यात ती आपल्याला आधुनिक शांताबाईंच्या रूपात दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये देखील सनीच्या या आगामी गाण्याची जोरदार चर्चा चालू आहे. ‘शांताबाई’ हे गाणे २०१५ साली प्रदर्शित झाले होते. या गाण्याने संपून महाराष्ट्रात नुसता धुमाकूळ घातला होता. आता आपल्याला या गाण्याला थोडा मॉर्डन टच दिलेला दिसणार आहे.
या गाण्याचे कोरिओग्राफर विष्णू देवा यांनी केली आहे. ‘शांताबाई’ हे मूळ गाणे संजय लोंढे यांचे आहे. नितीन सावंत आता या गाण्याला रिक्रिएट करणार आहेत. सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित गोष्टींवर आमदार निवास हा चित्रपट असणार आहे. चित्रपटात सनीचा रांगडा आणि मॉर्डन अंदाज बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
सनीचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले, तर बॉलिवूड व्यतिरिक्त ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे आणि साउथ इंडस्ट्रीमध्येही ती आपली उपस्थिती नोंदवत आहे. ती मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘हेलन’, ‘कोका कोला’ आणि ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सारखे चित्रपट करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- युक्रेनचे राष्ट्रपती ‘वोलोदिमीर झेलेन्स्की’ यांच्या कॉमेडी सिरिजला मोठी डिमांड ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम
- अक्षय कुमारने केला कोरोना काळातील दिवसांचा खुलासा, म्हणाला, ‘तेव्हा शूटिंग करणे खूप अवघड होते’
- नवीन निश्चल यांच्या प्रेमसंबंधांमुळे पहिल्या पत्नीसोबत झाला होता घटस्फोट, दुसरीच्या आत्महत्येमुळे तुरुंगात काढलेत दिवस