बॉलीवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी आपल्या अंदाजाने आणि स्टाईलमुळे सोशल मीडियावर खूपच ट्रोल होताना दिसत असते. ती नेहमीच आपले वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत असते आणि त्यासाठी तिला तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळत असतो. तिचे फोटोज् सोशल मीडियावर येताच क्षणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
नुकताच सनीने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तिचा एक फोटो शेअर केला आहे. तो खूपच व्हायरल होताना दिसत आहे.
ब्लॅक कलरचा ड्रेस घालून काढलेला सनीचा हा फोटो प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सनी एका झोपाळयावर पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सनीने एक कॅप्शन देखील दिले आहे, “बॅक इन ब्लॅक.”
अभिनेत्री सनी लियोनी ही आपल्या फॅशन सेन्स साठी खूपच लोकप्रिय आहे. तिला नेहमी नवीन आणि मॉडर्न ड्रेस घालायला आवडतात. तसं तर कोणत्याही ड्रेसमध्ये सनी प्रेक्षकांना दिवाणा बनवते. तिचे मॉडर्न कपडे असो किंवा ट्रेडिशनल असो, तिचा कोणताही अंदाज प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतो.