Monday, July 15, 2024

प्रभास करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण? ‘आदिपुरुष’मधील रामच्या पात्राची परदेशात चर्चा

सध्या देशभरात दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अभिनेता अल्लू अर्जून (Allu Arjun), राम चरण (Ram Charan), प्रभास (Prabhas) अशा आघाडिच्या अभिनेत्यांनी जोरदार अभिनय केलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता सगळ्या जगाच्या नजरा दाक्षिणात्य चित्रपट आणि अभिनेत्यांकडे वळलेल्या पाहायला मिळत आहेत. याआधी अनेक हॉलिवूडच्या चित्रपटांमध्य बॉलिवूडचे अभिनेते झळकले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच बाहुबली स्टार प्रभास लवकरच हॉलिवूड कथेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच प्रभासच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याच्या दमदार अभिनयासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. ‘बाहुबली’ चित्रपटात प्रभासने साकारलेल्या दमदार भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या यशाने प्रभासला रातोरात स्टार केले होते. त्यामुळेच अभिनेता प्रभास सध्या सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा राधेश्याम चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे त्यानंतर तो त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे.  सध्या तो अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणसोबत काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबर तो आगामी ‘सालार’ चित्रपटात ही झळकणार आहे. मात्र सध्या प्रभासच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाचीच सर्वात जास्त चर्चा पाहायला मिळत आहे.

प्रभास ‘आदीपुरूष’ चित्रपटात प्रभु श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची सध्या जगभरात सुरू आहे. या चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेची चर्चा थेट हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांच्या या चित्रपटात प्रभासची दमदार भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी प्रभासने प्रचंड मेहनत घेतली आहे जी त्याच्या या भूमिकेत दिसत आहे.

हा चित्रपट एकाच वेळी जगभरातील अनेक भागात आणि भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याच दरम्यान अभिनेता प्रशासशी एका हॉलिवूड चित्रपटासाठी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये त्याला चित्रपटात सुपरहिरोची भूमिका साकारायला मिळणार आहे. या बातमीने सध्या प्रभासच्या चाहत्यांना आता त्याला हॉलिवूडच्या चित्रपटात पाहण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

 

 

हे देखील वाचा