सध्या सोशल मीडियावर सगळीकडे अभिनेता बॉबी देओलच्या ‘लव हॉस्टेल’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. चित्रपटाने प्रेक्षकांना खूपच आकर्षित केले आहे. त्यामुळेच या चित्रपटाला लोकांचा भरभरुन प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील बॉबी देओलच्या भूमिकेचे सर्वात जास्त कौतुक केले जात आहे. फक्त चाहत्यांनीच नव्हेतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीसुद्धा बॉबी देओलच्या कामाचे कौतुक केले आहे. मात्र बॉबी देओलच्या या कौतुकात अभिनेता सलमान खानच्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
सध्या चित्रपटगृहात बॉबी देओल (Boby Deol), विक्रांत मेसी (Vikrant Massey) आणि सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव हॉस्टेल’ चित्रपट जोरदार धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील बॉबी देओलच्या कामाचे सगळ्यात जास्त कौतुक केले जात आहे. आपल्या कसदार अभिनयाने आणि दमदार लूकने बॉबीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. म्हणूनच सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याचे प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत. यामध्ये चित्रपट जगतातील अनेक स्टारसुद्धा सहभागी आहेत. याच यादीत आता सलमान खानची (Salman Khan) एंट्री झाली आहे. आपल्या जिवलग मित्रासाठी अभिनेता सलमान खाननेही कौतुकाची थाप देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या सगळीकडे याच पोस्टची चर्चा सुरू आहे.
सलमान खानने चित्रपटातील बॉबी देओलच्या कामाचे कौतुक करणारी पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की, “बॉबी लव हॉस्टेल चित्रपटातील तुझ्या भूमिकेचे कौतुक झाल्याचे मला पहायला मिळत आहे. खूप शुभेच्छा, मला आशा आहे की तू यापेक्षाही अजुन चांगले काम करण्याचा प्रयत्न करशील.” सध्या भाईजानची ही पोस्ट सगळीकडे जोरदार व्हायरल होत आहे. तत्पूर्वी ‘लव हॉस्टेल’ चित्रपटात अभिनेता बॉबी देओलने पहिल्यांदाच नकारात्मक खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात बॉबी देओलचा लूक खूपच खतरनाक दिसत आहे. सोबतच चित्रपटात शेवटी त्याचा मृत्यू झाल्याचेही दाखविण्यात आले आहे.
आपल्या कुरळ्या केसांमुळे आणि देखण्या चेहर्याने हा अभिनेता नेहमीच चित्रपटात चॉकलेट बॉयची भूमिका साकारताना दिसला आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा मुलगा असलेला बॉबी देओल काही वर्षापासून चित्रपट क्षेत्रातील येणार्या अपयशामुळे हैराण होता. आता पुन्हा एकदा त्याने या क्षेत्रात दमदार पुनरागमन केल्याचे दिसत आहे. बॉबी देओलच्या या यशस्वी पुनरागमनात सगळ्यात मोलाचा वाटा अभिनेता सलमान खानचे असल्याचे बोलले जात आहे. कारण अभिनेता सलमान खाननेच बॉबीला आपल्या ‘रेस ३’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. याचा खुलासा स्वतः अभिनेता बॉबी देओलने केला होता. ‘रेस ३’ चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचेही त्याने सांगितले होते. याआधी बॉबी देओल त्याच्या ‘आश्रम’ वेब सिरीजमुळे चर्चेत आला होता. यामधील बॉबीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.
हेही वाचा –