टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ने बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्याचवेळी, आता हा शो शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. नुकताच या शोचा सेमी फायनल एपिसोड दाखवण्यात आला. ज्यात योग गुरु रामदेव बाबा प्रेक्षकांच्या सततच्या मागणीमुळे गेस्ट म्हणून सामील झाले. याचा एक प्रोमो शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात प्रत्येकजण खूप मजा करताना दिसत आहेत आणि शिल्पा शेट्टी देखील बाबा रामदेव यांच्यासोबत बूमरॅंग व्हिडिओ बनवताना दिसत आहे.
शिल्पाने बाबा रामदेव यांच्यासोबतचा व्हिडिओ केला शेअर
शिल्पाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बाबा रामदेव यांच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात दोघे एकत्र योगा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, “फ्रेममध्ये पतंजलीच्या राजासोबत ‘अंजली’, स्वामीजी तुमच्या उपस्थितीने आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल तुमचे खूप आभार. केवळ योगामुळेच होईल! आत्मानमस्ते!” शिल्पाने पुढे ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’, नचपनचा उत्सव, कृतज्ञता, धन्य, शनिवार वाइब्स आणि योगामुळेच होईल हे हॅशटॅगचा वापर केला आहे.
रामदेव बाबा यांनी स्पर्धकांसोबत केला योगा
याशिवाय निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा शोची स्पर्धक असलेल्या नीरजा तिवारीशी स्वतःची तुलना करताना दिसत आहेत. शोचे होस्ट सांगतात की, नीरजाच्या सुपरमुव्हजमध्ये योगाच योगा आहे. म्हणूनच बाबा म्हणतात की, नीरजा त्यांच्यापेक्षा जास्त चपळ आणि वेगवान आहे. यानंतर रामदेव बाबा आणि नीरजा एकत्र योगा करायला लागतात. नीरजाची चपळता त्यांना आश्चर्यचकित करते.
Sirf #SuperNeerja hi nahi par Baba Ramdev Ji ne bhi kar kiya poore desh ki farmaish ko poora! Dekhiye inke acrobatic moves #SuperDancerChapter4 ke #SemiFinalEpisode mein Saturday raat 8 baje, sirf Sony par.@basuanurag @TheShilpaShetty @geetakapur @yogrishiramdev pic.twitter.com/JG7kPFe5Bq
— sonytv (@SonyTV) October 1, 2021
आगामी भागात दिसणार तब्बू
बॉलिवूडची सुंदर आणि अनुभवी अभिनेत्री तब्बू शोच्या आगामी भागात सहभागी होणार आहे. विशेष बाब म्हणजे तब्बू तिच्या ‘विजयपथ’ या चित्रपटातील ‘रुक रुक रुक’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. शिल्पाने याचा बूमरॅंग व्हिडिओही बनवला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “रुक, रुक, रुक …. कुक, कुक, कुक सारखं वाटतं. मी भाग्यवान आहे की, तुम्ही माझ्या आयुष्यात आणि शोमध्ये सोबत आहात.”
सुपर डान्सरचा ग्रँड फिनाले ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. शोचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर आहेत. काही वृत्तांमध्ये, शो बंद होण्याचे कारण असे मानले जाते की, त्याचा टीआरपी घसरला आहे. ‘सुपर डान्सर ४’ नंतर, त्याची जागा ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ने घेतली जाईल, जे १६ ऑक्टोबरपासून सुरू होईल. ज्याचे मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस हे परीक्षण करणार आहेत. शोशी संबंधित अनेक प्रोमोही प्रदर्शित करण्यात आले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दोनशे कोटी सोडा, समंथाला नाते संपवण्यासाठी घ्यायचा नव्हता एकही रुपया; मग अभिनेत्रीला काय हवं होतं?