Saturday, June 29, 2024

ऑस्करला जाणारा मदर इंडिया चित्रपट आजही आहे तुफान लोकप्रिय, मात्र गमावला आहे ‘हा’ एक मानाचा पुरस्कार

काही चित्रपट आणि गाणी कितीही जुनी झाली तरी त्यांची चर्चा मात्र प्रेक्षकांमध्ये होतच असते. बॉलिवूडमध्येही असे अनेक चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला तरी त्यांची लोकप्रियता काही कमी झालेली दिसत नाही.यामधलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजेच मदर इंडिया. या चित्रपटाने फक्त भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. म्हणूनच या चित्रपटाला हिंदी मनोरंजन जगतातील सर्वात चर्चित  चित्रपट म्हणून ओळखला जातो. जाणून घेऊया या चित्रपटाच्या कथेबद्दलच्या या खास गोष्टी. 

मदर इंडिया हा चित्रपट सन 1957 मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळाली की त्यामुळे त्या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटासाठीही नामांकन मिळाले होते. हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात अभिनेत्री नर्गिस राधाच्या भूमिकेत दिसली होती. राधाचा नवरा श्यामू एका अपघातात गंभीर जखमी झाला, त्यानंतर तो काम करू शकला नाही, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. अशा स्थितीत गावकऱ्यांच्या त्रासाने न तो घर सोडतो आणि दोन मुलांची जबाबदारी राधाच्या खांद्यावर येते.

उपासमार, वादळ, पूर अशा अनेक कठीण परिस्थितीत राधा आपल्या मुलांना वाढवते. इतकंच नाही तर चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये आईची भूमिका प्रचंड सोशिक दाखवली आहे ज्यामुळेच  तिला मदर इंडिया म्हणतात. या चित्रपटाचे दिग्दर्शक मेहबूब खान त्यांच्या पत्नीसह अकादमी पुरस्कार उर्फ ​​ऑस्कर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हॉलिवूडमध्ये पोहोचले होते. या चित्रपटानंतर मेहबूब यांनी सन ऑफ इंडिया नावाचा चित्रपटही बनवला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र तिसऱ्या मतदानानंतर अवघ्या एका मतामुळे मदर इंडियाला ऑस्कर मिळू शकला नाही. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाचा पुरस्कार त्या वर्षी इटालियन निर्माता डिनो डी लॉरेटिनच्या नाईट्स ऑफ कॅबिरिया या चित्रपटाला मिळाला. याच चित्रपटादरम्यान सुनील दत्त नर्गिसमध्ये जवळीक वाढली होती.

या चित्रपटातील आगीचे दृश्य गुजरातमधील सुरत शहरात शूट करण्यात आले होते. त्यावेळी नर्गिसला आगीच्या ज्वाळांमध्ये पळावे लागल्याचे सांगण्यात आले, मात्र वाऱ्याची दिशा बदलल्याने आग पसरली. तेव्हाच नर्गिस या आगीत अडकली. या चित्रपटात सुनील दत्तने नर्गिसच्या मुलाची भूमिका केली होती, त्याने तिची सुटका करून तिला वाचवले. सुनील दत्तने ब्लँकेटसह उडी मारली आणि नर्गिसला वाचवले. त्यादरम्यान सुनीलच्या छातीवर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या आणि तापही खूप वाढला होता. यादरम्यान नर्गिसने खूप मदत केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यादरम्यान नर्गिनचे सुनील दत्तवरील प्रेम वाढले आणि दोघांनीही लवकरच लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा