Monday, July 21, 2025
Home बॉलीवूड आसाममधील लोकांच्या शेतात- घरात पुराचे पाणी, दु:ख न बघवल्यामुळे आमिरने केली ‘एवढ्या’ लाखांची मदत

आसाममधील लोकांच्या शेतात- घरात पुराचे पाणी, दु:ख न बघवल्यामुळे आमिरने केली ‘एवढ्या’ लाखांची मदत

आसाम राज्य सध्या संकटातून जात आहे. आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये अनेक दिग्गज व्यक्ती पुढे येऊन आपल्या परीने होईल ती मदत करत आहेत. अशात बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान यानेही यामध्ये उडी घेतली आहे. आमिर नेहमीच अशा स्थितीत पुढे येऊन मदतीचा हात देत असतो. अशात त्याने आसामच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान दिले आहे.

यावर्षी आलेल्या विध्वंसक पुरामुळे आसाम राज्यावर (Assam Floods) मोठे संकट उभे ठाकले आहे. अशामध्ये तेथील लोकांच्या मदतीसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक पुढे येत आहेत. आसाममधील लोकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरल्यामुळे त्यांना जंगलात जाऊन राहावे लागेत आहे. याशिवाय त्यांच्यापुढे इतर कोणताही पर्याय नाहीये.

या पुरामुळे लोकांना फक्त घराचीच नाही, तर अन्न आणि पाण्याचीही भ्रांत आहे. हे संकट आता पूर्वीपेक्षा खूप मोठे झाले आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) यानेही आसामच्या लोकांच्या मदतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे.

आमिर खान याने आसामच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लाखो रुपयांची मदत केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचा उल्लेख केला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २५ लाख रुपयांचे योगदान देऊन आमच्या राज्यातील पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. त्याने दाखवलेल्या काळजीसाठी आणि उदारतेसाठी मी कृतज्ञ आहे.”

आसाममधील सतत पावसामुळे पुराची परिस्थिती खराब होत चालली आहे. जवळपास ४२ लाख २८ हजारांहून अधिक लोक संकटात सापडले आहेत. आथापर्यंत ७१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार मागील २४ तासांमध्ये पुरात ९ लोकांचा जीव गेला आहे. तसेच, ५,१३७ गाव पुराच्या तावडीत सापडले आहेत. देशाच्या यंत्रणा या संकटसमयी लोकांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा