Monday, July 1, 2024

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अजय देवगणने लहान मुलासारखं ‘हे’ काम करताच भडकले चाहते

कलाकार त्यांच्या मुलांना पाहून ते स्वत:ही कधीकधी लहान मुलांप्रमाणे वागताना दिसतात. यादरम्यानचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होतात, जे त्यांच्या चाहत्यांच्याही पसंतीस पडतात. असाच एका सुपरस्टार अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या अभिनेत्याला तुम्ही नेहमी गंभीर आणि कमी बोलताना पाहिले असेल. मात्र, तुम्ही या अभिनेत्याचा असा मजेशीर व्हिडिओ यापूर्वी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसायला लागाल.

तर ज्या अभिनेत्याची चर्चा होत आहे, तो अभिनेता इतर कुणी नसून सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आहे. खरं तर अजय एक मजेशीर टू व्हीलर राईड (Ajay Devgn Two Wheeler Ride) करताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर गोड हास्यदेखील आहे, जे तुमचे मन नक्कीच जिंकेल. अजयचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना भलताच आवडत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच काजोल (Kajol) हिची बहीण तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherji)  हिनेदेखील हसण्याचे इमोजी कमेंट केले आहेत.

अजय देवगण देवगण याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “तर अशाप्रकारे मी रोल करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) 

अजयच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने लिहिले आहे की, “सर, तुम्हाला पाहून लहानपणीचे दिवस आठवले.” तसेच, दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “सर, तुमच्याकडून तर बिल्कुल अशी अपेक्षा नव्हती.”

Ajay-Devgn-Post
Photo Courtesy: Instagram/ajaydevgn

‘दृश्यम २’ सिनेमा घेऊन येतोय अजय देवगण

Ajay-Devgn-Post
Photo Courtesy: Instagram/ajaydevgn


नुकतेच अजयने जाहीर केले होते की, तो ‘दृश्यम २’ सिनेमा घेऊन येत आहे. हा सिनेमा १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी सिनेमात आणखीच सस्पेन्स आणि थ्रिल असेल. सिनेमात अजय देवगण याच्याव्यतिरिक्त श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर हेदेखील असणार आहेत. तसेच, ही सर्व तीच स्टार कास्ट आहे, जी सिनेमाच्या पहिल्या भागात दिसली होती. मात्र, या सिनेमात एका नवीन अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. तो अभिनेता इतर कुणी नसून अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आहे.

खरं तर ‘दृश्यम’ हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र, सन २०२०मध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे ‘दृश्यम २’ सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा