Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड श्वास रोखून धरा! अक्षयचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीझ

श्वास रोखून धरा! अक्षयचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीझ

हिंदी चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण करणाऱ्या सुपरस्टार्समध्ये अक्षय कुमारचाही समावेश होतो. तो नेहमी सामाजिक विषयांवरील चित्रपट करताना दिसतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहते भरभरून प्रेम देतात. अशातच अक्षय आता चाहत्यांसाठी एक चित्रपट घेऊन येत आहे. त्यामध्ये तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सूर्यवंशी’ असे आहे. हा चित्रपट या दिवाळीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. अशातच चित्रपटाचे निर्माते चाहत्यांना दरदिवशी चित्रपटाशी संबंधित सरप्राइज देत आहेत. आता त्यांनी चित्रपटाचे आणखी एक धमाकेदार पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये अक्षयचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.

या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ‘हा चित्रपट या दिवाळीला आपल्या कुटुंबाला चित्रपटगृहात पुन्हा घेऊन येईल.’ खरं तर, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मागील वर्षी २ वेळा पुढे ढकलल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Superstar Akshay Film Sooryavanshi New Poster With New Slogan Release)

ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी रविवारी (२४ ऑक्टोबर) ट्वीट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “काऊंटडाऊन सुरू… ‘सूर्यवंशी’चे नवीन पोस्टर… टीम #सूर्यवंशी #नवीन पोस्टरचे अनावरण करते… सिनेमा ५ नोव्हेंबर, २०२१ मध्ये… #RohitShetty दिग्दर्शित, बहुप्रतिक्षित बिग स्टार्स #AkshayKumar, #AjayDevgn, #RanveerSingh and #KatrinaKaif. #BackToCinemas #Diwali.”

सर्वात व्यस्त अभिनेता अक्षय कुमार
अक्षय हा हिंदी चित्रपटसृष्टीतील असा अभिनेता आहे, ज्याच्याकडे आता भरपूर चित्रपट आहेत. तो एकसोबत अनेक चित्रपटांचे शूटिंग करत आहे. नुकतेच त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर सांगितले होते की, त्याने ऊटीमध्ये आपल्या आगामी ‘रामसेतू’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. तसेच, दुसरीकडे त्याने ट्विटरवर सांगितले होते की, त्याने आगामी ‘ओएमजी २’ या चित्रपटाची शूटिंगही सुरू केली आहे. त्याने या चित्रपटातील लूकही शेअर केला होता.

आपला हा लूक शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कर्ता करे न कर सके शिव करे सो होय. तुमच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांची आवश्यकता आहे. ओएमजी २ साठी आमचा खरा आणि प्रामाणिक प्रयत्न एक आवश्यक सामाजिक मुद्दा उचलणे आहे. आदियोगी या यात्रेसाठी आम्हाला आशीर्वाद द्या. हर हर महादेव.”

५ हजार प्रिंटसह प्रदर्शित होणार सूर्यवंशी
खरं तर, अक्षय कुमारचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ हा या दिवाळीला ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी म्हटले की, हा चित्रपट मोठा धमाका करणार आहे. इतकेच नाही, तर हा चित्रपट हिट करण्यासाठी जबरदस्त योजनाही आखण्यात आली आहे. जेणेकरून प्रेक्षक चित्रपटगृहात येण्यासाठी प्रवृत्त होतील. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा चित्रपट ५००० प्रिंटसह देशभरात प्रदर्शित होणार आहे.

येत्या काही काळात अक्षय ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’, ‘सिंड्रेला’ यांसारख्या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; तर कंगणा, धनुष, मनोज बाजपेयी ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार

हे देखील वाचा