बॉलिवूडमधील कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यापैकीच एक आहे अक्षय कुमार. अक्षयही त्याच्या अभिनयासोबत त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे ही शिस्तप्रिय सवयही तो अंगी बाळगतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, लेट नाईट पार्टीत तो जाणे शक्यतो टाळतो. चाहतेही यासाठी त्याचे कौतुक करतात. मात्र, आता अक्षयचा नुकताच एका लेट नाईट पार्टीतील व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.
रात्री उशिरा पार्टीत पोहोचला अक्षय कुमार
खरं तर, अक्षय कुमार (Akshay Kumar) अश्विन यार्डी याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पोहोचला होता. आता यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नेटकरी त्याला खडेबोल सुनावत आहेत. व्हायरल व्हिडिओत अक्षय (Akshay Kumar Viral Video) त्याच्या कारमधून बाहेर येताना दिसत आहे. तो रेस्टॉरंटमध्ये जाण्यापूर्वी पॅपराजींना पोझही देतो. 55 वर्षीय अक्षयने यावेळी काळ्या रंगाची हुडी, काळ्या रंगाची जीन्स आणि पीच रंगाचे स्नीकर्सही परिधान केले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी त्याच्या फिटनेसची प्रशंसा केली, तर काहींनी त्याला ट्रोल केले.
View this post on Instagram
अक्षयच्या पार्टी करण्याला चाहत्यांची नापसंती
अक्षय कुमार याच्या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने म्हटले की, “रात्र झाली आहे. तू अजूनही झोपला नाही. सकाळी 4 वाजता कसा उठणार.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हा कधीपासून पार्टीत जाऊ लागला.” आणखी एकाने लिहिले की, “लवकर झोपा सर सकाळी 4 वाजता उठायचं आहे.” अक्षय कुमारने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, तो रात्री 9.30 वाजेपर्यंत झोपतो आणि सकाळी 4 किंवा 4.30 वाजता उठतो. यानंतर तो वर्कआऊट करतो. त्याला सकाळी स्विमिंग, योगा आणि मेडिटेशन करायला आवडते.
अक्षयचे आगामी सिनेमे
सुपरस्टार अक्षय कुमार याने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे. त्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘राम सेतू’ (Ram Setu) या सिनेमात दिसणार आहे. नुकताच त्याच्या या सिनेमाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या वर्षी त्याचा पाचवा सिनेमा प्रदर्शित होईल. ‘राम सेतू’ हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यावर्षी त्याचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘कठपुतली’ आणि ‘बच्चन पांडे’ हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! ‘तारक मेहता…’मधील दयाबेन ‘या’ घातक आजाराशी देतेय झुंज, चाहत्यांना लागलीय काळजी
अखेर ‘बिग बॉस मराठी’च्या आवाजामागील खरा चेहरा समोर आलाच, जाणून घ्या कोण आहे तो