Wednesday, July 3, 2024

बापरे! ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’मुळे चिंतेत पडले ‘पुष्पा २’चे दिग्दर्शक? अजून शूटिंगही केली नाही सुरू

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा’ या सिनेमाने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले. सन २०२१ रोजी आलेल्या ‘पुष्पा’ या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. यानंतर आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर या सिनेमाचा दुसरा भागही लवकर चित्रपटगृहात पोहोचवण्याची तयार केली जात होती. त्यानंतर ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ या सिनेमांच्या ब्लॉकबस्टर यशानंतर दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा २’ सिनेमाबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.

असे म्हटले जात आहे की, ‘आरआरआर’ (RRR) आणि ‘केजीएफ २’ (KGF 2) या सिनेमांचे यश पाहून दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये आणखी भर घालण्यात व्यस्त झाले आहेत.

सन २०२३-२४पर्यंत वाढली ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाची तारीख
इतकेच नाही, तर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची शूटिंगही अद्याप सुरू होऊ शकली नाहीये. त्यानंतर आता प्रत्येकीच नजर ही सिनेमाच्या दुसऱ्या भागाकडे लागली आहे. सिनेमाची शूटिंग मार्च महिन्याच्या शेवटी सुरू होणार होती. मात्र, त्यात सातत्याने वेळ लागत आहे आणि त्यामुळे सिनेमा अजूनही रुळावर येऊ शकला नाहीये. आता माध्यमांतील वृत्तानुसार, सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची शूटिंग यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सुरू होऊ शकते. त्यानंतर सिनेमाही उशिरा प्रदर्शित होईल.

माध्यमांतील वृत्तानुसार, ‘पुष्पा २’ पुढील वर्षी २०२३च्या शेवटी डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा २०२४च्या सुरुवातीपर्यंत मोठ्या पडद्यावर येईल. अशात ‘पुष्पा २’ सिनेमासाठी प्रेक्षकांना जरा जास्तच वाट पाहावी लागणार आहे. ही बातमी ‘पुष्पा २’ सिनेमाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना निराश करणारी आहे.

‘पुष्पा २’मध्ये विजय सेतुपतीची एन्ट्री
असे वृत्त समोर येत आहे की, अल्लू अर्जुन- रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा २’ या सिनेमात दमदार अभिनेता विजय सेतुपती याची एन्ट्री होणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, विजय सेतुपतीही या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. यापूर्वीही विजयला ‘पुष्पा’च्या पहिल्या भागासाठी ऑफर करण्यात आले होते. मात्र, त्याने त्यावेळी या सिनेमाला नकार दिला होता. त्यामुळे फहाद फासिल याला या सिनेमात घेण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा