Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘बापासारखाच धमाकेदार स्टार बनेल’, धनुषच्या छोट्या मुलाचा ऍटिट्यूड पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट

‘बापासारखाच धमाकेदार स्टार बनेल’, धनुषच्या छोट्या मुलाचा ऍटिट्यूड पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट

भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हॉलिवूडमध्ये आपला हात आजमावताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा, इरफान खान यांसारख्या कलाकारांनंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष हादेखील हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवताना दिसणार आहे. धनुष त्याच्या ‘द ग्रे मॅन’ या आगामी हॉलिवूड सिनेमामुळे व्यस्त आहे. नुकतेच त्याने लॉस एंजेलिस येथे ‘द ग्रे मॅन’ सिनेमाच्या प्रीमिअरला हजेरी लावली होती. यादरम्यानचे शानदार फोटो अभिनेत्याने शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये त्याच्यासोबत त्याची मुलं यात्रा आणि लिंगाही दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर धनुष (Dhanush) याच्या मुलांचीच चर्चा रंगली आहे. यात्रा (Yatra) आणि लिंगा (Linga) हे त्याच्या वडिलांचा सिनेमा पाहण्यासाठी अमेरिकेत पोहोचले होते. ‘द ग्रे मॅन’ या हॉलिवूड सिनेमाचे दिग्दर्शन रूसो भावंडांनी केले आहे. धनुषसोबतच अनेक अमेरिकन कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

‘द ग्रे मॅन’ या सिनेमाच्या प्रीमिअरला धनुषने त्याच्या मुलांसोबत (Dhanush With His Son) एन्ट्री केली. यावेळी त्यांचा अंदाज पाहण्यासारखा होता. चाहत्यांनाही त्यांचा लूक खूपच आवडला. तसं पाहिलं, तर धनुष त्याच्या मुलांसोबत खूपच कमी कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतो. यावेळी तो रेड कार्पेटवर यात्रा आणि लिंगा (Yatra And Linga) यांच्यासोबत पोहोचला. यावेळी बापलेकांनी एकसारखेच आऊटफिट परिधान केले होते. यावेळचा सुंदर फोटो धनुषने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुषच्या मुलांचीच रंगलीय चर्चा
धनुष याने हे फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले. त्याने लिहिले की, “जेव्हा तुम्हाला जाणवते की, दोघांनीही तुमच्याकडून पूर्णपणे शोची लाईमलाईट चोरली आहे. मी ‘द ग्रे मॅन’च्या प्रीमिअरला यात्रा आणि लिंगासोबत.” या फोटोला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, ६ हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

चाहते या फोटोवर कमेंट करत धनुषच्या मुलांची प्रशंसा करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “मुलं खूप जबरदस्त दिसत आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “धनुषचा लहान मुलगा त्याच्या वडिलांसारखाच धमाकेदार स्टार बनेल.” आणखी एक चाहता म्हणाला की, “यात्रा हा धनुषची कार्बन कॉपी आहे.”

धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट
खरं तर, धनुष याने सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत सन २००४मध्ये लग्न केले होते. यात्रा आणि लिंगा ही या दोघांचीच मुलं आहेत. मात्र, १८ वर्षांनंतर धनुष आणि ऐश्वर्या यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही जानेवारी २०२२मध्ये सोशल मीडियावरून वेगळे होत असल्याचे सांगितले होते. मात्र, दोघांनीही कधीच या विषयावर मौन सोडलेले नाहीये.

खूपच जास्त आहे ‘द ग्रे मॅन’चे बजेट
धनुषचा ‘द ग्रे मॅन’ या आगामी ऍक्शन थ्रिलर सिनेमा येत्या २२ जुलै, २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा त्याच्या बजेटमुळेही खूप चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, हा सिनेमा २० कोटी डॉलर्समध्ये बनला आहे. हा नेटफ्लिक्सवरील सर्वात महागडा सिनेमाही असल्याचे म्हटले जात आहे. आता चाहते या सिनेमासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

भारीच ना! प्रियांका चोप्राच्या घरात लहान पाहुण्याचे आगमन, वाचा कुणी दिलीय ‘ही’ गुडन्यूज

खेसारीने गां’जा पिऊन चालवली गाडी, शेजारी बसलेल्या अभिनेत्रीचाही उडाला थरकाप, व्हिडिओला ६ कोटी व्ह्यूज

‘तू कुठे गरिबांमधला राहिलाय’, रिक्षावाल्याचा प्रताप सांगितल्यानंतर ‘सल्या’च्या चाहत्याची लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा