Wednesday, July 3, 2024

किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केल्यानंतर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला समर्थन देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार मैदानात उतरले आहेत. अभिनेता सलमान खानसह अनेक दिग्गज कलाकार शाहरूखच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते. याचवेळी सुपरस्टार ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी आणि डिझायनर सुझेन खान सुद्धा आर्यनच्या समर्थनात मैदानात उतरली आहे. आर्यन चांगला मुलगा असल्याचे तिने म्हटले आहे.

तत्पूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (०२ ऑक्टोबर) मुंबईमधील रेव्ह पार्टी सुरू असलेल्या जहाजावर छापा टाकला होता. ज्यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आणखी आठ जणांना अटक करण्यात आले आहे. या सर्वांकडे चरस, कोकेन यांसारखे अंमली पदार्थ सापडल्याची बातमी समोर आली आहे. तसेच आर्यन खान याने अमली पदार्थ सेवन केल्याची कबुलीही चौकशीत दिली आहे. (Superstar Hrithik Roshan EX Wife Sussanne Khan Calls Aryan Khan Good Kid Stand By Shahrukh And Gauri)

या प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्याने बॉलिवूड विश्वात चर्चांना उधाण आले आहे. शाहरुख खान आणि गौरी खानला या कठीण प्रसंगी धीर ण्यादेसाठी अनेक दिग्गज कलाकार शाहरूखच्या बंगल्यावर हजेरी लावत आहेत. अभिनेत्री सुझेन खान हिने सुद्धा आर्यन खानच्या समर्थनात वक्तव्य केले आहे. तिने म्हटले आहे की, “हे सर्व आर्यनच्या बाबतीत नाही. आर्यन खान चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. तो चांगला मुलगा आहे. मी त्याला ओळखते.” बॉलिवूड कलाकारांना कशाप्रकारे टार्गेट केले जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे, असंही तिने पुढे म्हटले आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आर्यन खानला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्यन खानकडून हे प्रकरण प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे लढवत आहेत. सतीश मानेशिंदे शिंदे यांनी यापूर्वी सलमान खान, संजय दत्तसारख्या दिग्गज कलाकारांच्या प्रकरण लढवले आहेत.

अभिनेता सलमान खानही, शाहरुख खानसोबत असलेले सगळे मतभेद विसरून या कठीण प्रसंगी त्याच्या सोबत उभा राहिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण आणि रिया चक्रवर्ती प्रकरण जोडणारा ‘हा’ आहे सारखाच दुवा

हे देखील वाचा